Health care : दररोज सकाळी ‘हे’ व्यायामाचे प्रकार करा आणि झटपट वजन कमी करा !

| Updated on: Jun 21, 2021 | 4:43 PM

वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करत असतात. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे.

Health care : दररोज सकाळी हे व्यायामाचे प्रकार करा आणि झटपट वजन कमी करा !
निरोगी आयुष्य
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करत असतात. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. (Do this type of exercise every morning to lose weight)

दररोज एक तास चालण्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत आणि मुड चांगला करण्यासाठी आपण गाणे देखील ऐकू शकतो. कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो.

दोरीवरच्या उड्या मारणे फक्त लहान मुलांसाठी असते, असे बहुतेक लोकांना वाटते. पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत.दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. कार्डिओ व्यायाम आपण सहजपणे घरी करू शकता. यासाठी, आपण सरळ उभे रहावे आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला स्पर्श केला पाहिजे तर उजवा पाय वरपर्यंत आणला पाहिजे. पुन्हा सुरूवातीच्या स्थितीवर या आणि आता ही प्रक्रिया डावीकडून पुन्हा करा.

आपण 30 सेकंदांच्या ब्रेकवर हा व्यायाम दररोज 2 ते 3 सेटमध्ये करू शकता.  हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते. असे केल्याने तुमची मांसाची स्नायू मजबूत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

(Do this type of exercise every morning to lose weight)