Health Tips : निरोगी आरोग्यासाठी बडीशेप युक्त दूध प्या आणि रोगांना दूर ठेवा!

| Updated on: Sep 23, 2021 | 11:59 AM

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, दुध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. दुधाचा आहारात समावेश केल्यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. प्रत्येक घरात लोकांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिसळलेले दूध प्यायला आवडते.

Health Tips : निरोगी आरोग्यासाठी बडीशेप युक्त दूध प्या आणि रोगांना दूर ठेवा!
बडीशेप दूध
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, दुध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. दुधाचा आहारात समावेश केल्यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. प्रत्येक घरात लोकांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिसळलेले दूध प्यायला आवडते. यापैकी एक बडीशेप आहे जी भारतीय मसाल्यांमध्ये वापरली जाते. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच बडीशेप आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (Drink a mixture of Fennel seeds and milk for good health)

दुधात बडीशेप मिसळणे फायदेशीर आहे का?

दूध आणि बडीशेप दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण दोन्ही एकत्र पिणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, रोज बडीशेप दूध प्यायल्याने केवळ एक पोषकद्रव्य वाढत नाही. उलट, ते रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. दुधात अनेक प्रकारची निरोगी चरबी, प्रथिने आणि खनिजे असतात. यामुळे आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये बडीशेपयुक्त दूध घेतले पाहिजे.

पचन सुधारते

बडीशेप गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. कारण त्यात एक तेल आहे जे लाळमध्ये मिसळून पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. याशिवाय बडीशेपमधील गॅस्ट्रिक एंजाइमच्या मदतीने चयापचय सुधारते. या व्यतिरिक्त हे पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.

हाडे आणि दात मजबूत करते

दुधात प्रथिने आणि कॅल्शियम असते. ज्यामुळे दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. बडीशेपमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीजचे प्रमाण चांगले असते. जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी आपण एक ग्लास दूध घेतले पाहिजेत.

डोळ्यांसाठी चांगले

बडीशेप अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. म्हणून ती मोतीबिंदू आणि इतर समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार बडीशेपचा दुधात बदाम मिक्स करून प्यायल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.

वजन नियंत्रित करण्यासाठी 

जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल

टॉक्सिक घटक निघून जातात

यात असलेले आवश्यक तले आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.

हृदयाचे आरोग्य सुधारते

यातील फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयरोगाचा धोका देखील कमी करते. तसेच, बडीशेप शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Drink a mixture of Fennel seeds and milk for good health)