रोज रात्री झोपण्याआधी ‘हे’ पेय प्या, कोणताही व्यायाम न करता वजन घटवा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar

Updated on: Jun 19, 2021 | 7:16 AM

जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. परंतु वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर अवलंबून राहणे योग्य नाही, आहारासह काही व्यायाम देखील करावे लागतील.

रोज रात्री झोपण्याआधी 'हे' पेय प्या, कोणताही व्यायाम न करता वजन घटवा!
सब्जाचे पानी

मुंबई : जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. परंतु वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर अवलंबून राहणे योग्य नाही, तर त्यासाठी आपल्याला काही खास पेय देखील प्यावे लागतात. जेणेकरून अतिरिक्त कॅलरी बर्न करता येतील. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे तुम्ही सहज कॅलरी बर्न करू शकता. (Drink sabja water and lose weight)

यासाठी आपल्याला दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर सब्जाचे खास पेय घ्यावे लागेल. यामुळे आपली कॅलरी बर्न होण्यास मदत होते. सब्जाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आणि मॅग्नेशियम असतात. सब्जा हा वनस्पती-आधारित प्रथिने आहे. त्याचे सेवन केल्याने पोट भरते आणि भूक देखील नियंत्रणात राहते. सब्जाचे पेय तयार करण्यासाठी सर्वात अगोदर एक ग्लास पाणी घ्या आणि ते पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यानंतर पाणी गरम झाल्यावर त्या पाण्यामध्ये सब्जा मिक्स करा आणि गरम असतानाच प्या.

यामुळे आपल्या शरीरावर असलेले चरबी बर्न होण्यास मदत होते. आपण हे पाणी सतत एक महिना पिलेतरी आपले वजन कमी होईल. आपण दलियामध्ये मिसळून, अथवा पाण्यात टाकून याचे सेवन करू शकता. विशेष म्हणजे सब्जाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. वजन कमी करण्यासाठी देखील सब्जा फायदेशीर आहे. फालूदा पेय हे थंड आणि गोड असते. हे आपण घरीही बनवू शकता. फालूदामध्ये सब्जा जास्त प्रमाणात वापरला जातो.

उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात. दररोज एका ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते. व्हिटामिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकते. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Drink sabja water and lose weight)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI