दररोज सकाळी ‘हे’ खास पेय प्या आणि वाढलेले वजन झटपट कमी करा!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नुसत्या व्यायाम करून काही विशेष फायदा होत नाही. त्यासाठी आपल्याला खाण्यावर देखील विशेष लक्ष द्यावे लागते. वाढलेले वजन अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. यामुळे वजन कमी करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे.

दररोज सकाळी 'हे' खास पेय प्या आणि वाढलेले वजन झटपट कमी करा!
खास पेय

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी नुसत्या व्यायाम करून काही विशेष फायदा होत नाही. त्यासाठी आपल्याला खाण्यावर देखील विशेष लक्ष द्यावे लागते. वाढलेले वजन अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. यामुळे वजन कमी करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी उपाशी पोटी एक खास पेय घेतले तर आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. (Drink this drink to lose weight)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुळशीचे पाने अत्यंत फायदेशीर आहेत. आपण जर तुळशीच्या पानांचे खास पेय दररोज सकाळी घेतले तर आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला दहा ते बारा तुळशीची पाने घ्यावी लागतील.  पाने एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा. अर्धा तास पाणी उकळूद्या. त्यानंतर यामध्ये मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटीच घेतले पाहिजे.

तुळशीची पाने ताप आणि सर्दीसाठी फायदेशीर आहेत. आपण चहामध्ये टाकून तुळशीच्या पानांचे सेवन करू शकतो. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळावी लागतील आणि त्याचे सेवन करावे लागेल. तुळशीच्या पानांचा चहा डोकेदुखी दूर करण्यासाठी चांगला आहे. आपण कपाळावर तुळशी आणि चंदनची पेस्ट देखील लावू शकता. यामुळे डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. पोटात दुखणे, बद्धकोष्ठता आणि अपचन यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता.

तुळशीचा एक चमचा रस आणि आल्याचा एक चमचा रस मिसळावा. यामुळे पोटदुखीमध्ये आराम मिळेल. मासिक पाळीच्या वेदनासाठी आपण तुळशी चहा देखील घेऊ शकता. यामुळे वेदनापासून आराम मिळेल. तुळशीत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अँटीऑक्सिडेंट असतात. ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. चहामध्ये किंवा कच्चे देखील आपण तुळशीचे पाने खाऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink this drink to lose weight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI