दररोज सकाळी दोन खारीक आणि गुळ खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 09, 2021 | 5:38 PM

सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्यासाठी दुर्लक्ष करतो. यामुळे अगदी कमी वयातच आपल्याया विविध आजार होण्यास सुरूवात होते.

दररोज सकाळी दोन खारीक आणि गुळ खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा!
गुळ

मुंबई : सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्यासाठी दुर्लक्ष करतो. यामुळे अगदी कमी वयातच आपल्याला विविध आजार होण्यास सुरूवात होते. जरी आपल्याला काही कामामुळे आरोग्यासाठी लक्ष देणे होत नसेल तरी देखील आपण खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेष करून आपण दररोज सकाळी आपल्या आहारात दोन खारीक आणि गुळ घेतला पाहिजे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. (Eating Kharik and jaggery is beneficial for health)

खारीकमध्ये अनेक प्रकारचे पाैष्टीक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खारीकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असते. ज्यामुळे आपल्याला दिवभराची ऊर्जा या दोन खारीकांमुळे मिळते. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. गूळ हा दमा आणि ब्राँकायटिसपासून बचाव करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना श्वसनासंबंधी काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन गूळ खायला हवं. तिळ-गुळाचे लाडू खाणंही फायदेशीर ठरेल. गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे.

दूध आणि गुळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत. दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवते, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर होतो, असे अनेक फायदे होतात. दुधात गुळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात. पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating Kharik and jaggery is beneficial for health)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI