AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त महिनाभर खा ‘हे’ फळ, चेहरा दिसेल चमकदार, वजनही होईल कमी

अननस हे गोड आणि रसाळ फळ असून याचे अनेक फायदे आहेत. हे फळ स्वादिष्ट तर आहेच पण यामुळे अनेक आजारांपासूनही मुक्तता मिळते.

फक्त महिनाभर खा 'हे' फळ, चेहरा दिसेल चमकदार, वजनही होईल कमी
| Edited By: | Updated on: Nov 09, 2024 | 9:15 AM
Share

आजच्या धावपळीच्या काळात निरोगी राहणे हे आपले पहिले प्राधान्य असायला हवे. जेव्हा आपण निरोगी असण्याबद्दल आणि विशेषतः आहराबद्दल बोलतो तेव्हा फळांचा उल्लेख नक्कीच केला जातो. पण एक फळ याबद्दल क्वचित चर्चा केली जाते. ते म्हणजे अननस…. हे गोड आणि रसाळ फळ खूपच पोषण आणि फायद्यांनी परिपूर्ण आहे. हे फळ स्वादिष्ट तर आहेच पण त्याचा आपल्या आरोग्यालाही खूप फायदा होतो. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही महिनाभर अननसाचे सेवन केले तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

त्वचेवर चमक येते : अननसामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंटस आणि जीवनसत्वे असतात. ज्यामुळे त्वचेची चमक कायम राहण्यास मदत होते. अननसाचे सेवन केल्याने त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. महिनाभर अननस खाल्ल्याने तुमच्या त्वचेत नैसर्गिक चमक आणि ताजेपणा येऊ शकतो.

हाडे मजबूत होतात : अननसामध्ये मॅगनीज आढळते, जे हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. अननसाचे महिनाभर नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

वेदना आणि सुजेपासून मिळतो आराम : जर तुम्ही शारीरिक श्रम किंवा कसरत करत असाल, तर अननसाचे सेवन केल्याने स्नायू रिकव्हर होण्यासही मदत होते. यामुळे पचनक्रियाही सुधारते. तसेच जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी देखील अननस प्रभावी ठरते. अननसाचे नियमित सेवन केल्याने दुखापतीमुळे होणारी सूज, सांधेदुखी यापासून आराम मिळतो.

पचन सुधारते : अननसाचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था चांगले काम करते. ज्यामुळे अपचन, गॅस आणि इतर पोटांच्या समस्येपासून आराम मिळतो. हे तुमच्या शरीराला फायबरचा पुरवठा देखील करते, ज्यामुळे मल नियमितपणे आणि सुलभपणे जाण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर : अननसाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. अननस नैसर्गिक फॅट बर्नरचे काम करते. ज्यामुळे भूक कमी होते आणि तुम्ही दीर्घकाळ तृप्त राहता. महिनाभर याचे सेवन केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहतात मदत मिळू शकते.

Follow Us
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.