Amla Side effects : ‘या’ लोकांसाठी आवळ्याचे सेवन ठरू शकते हानिकारक, वाचा महत्वाची माहीती!

| Updated on: Dec 09, 2021 | 1:13 PM

हिवाळ्यात आवळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. थंडीच्या मोसमात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता. हे स्वयंपाक आणि औषधींसाठी विविध स्वरूपात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

Amla Side effects : या लोकांसाठी आवळ्याचे सेवन ठरू शकते हानिकारक, वाचा महत्वाची माहीती!
आवळा
Follow us on

मुंबई : हिवाळ्यात आवळ्याचा (Amla) आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. थंडीच्या मोसमात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता. हे स्वयंपाक आणि औषधींसाठी विविध स्वरूपात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु काही लोकांसाठी ते हानिकारक देखील आहे. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी जास्त आवळ्याचे सेवन करू नये.

-आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, ज्यामुळे हे आम्लयुक्त बनते. अभ्यास दर्शविते की हे फळ खाल्ल्याने छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते. परंतु हायपर अॅसिडिटीने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आवळा जास्त प्रमाणात खाणे धोकादायक आहे. आवळा रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटात जळजळ आणि अॅसिडिटी होऊ शकते.

-काही अभ्यासामध्ये असेही सांगण्यात आले आहे की, आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी आवळा फायदेशीर असला तरी ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी आहे त्यांच्यासाठी ते चांगले नाही. अशा परिस्थितीत ते हानिकारक ठरू शकते आणि हायपोग्लायसेमियाचा धोका वाढू शकतो.

-जर तुमची टाळू कोरडी असेल किंवा तुमची त्वचा कोरडी असेल तर आवळा जास्त खाल्ल्याने समस्या वाढू शकते. यामुळे केस गळणे, खाज येणे, कोंडा होणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. आवळ्यामध्ये काही घटक असल्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे आवळा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..