Weight Loss : वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा अत्यंत फायदेशीर, वाचा!

| Updated on: Sep 30, 2021 | 7:35 AM

कोरोना आणि त्यानंतर झालेल्या लाॅकडाऊनमुळे आपल्याला घरात बसावे लागले. यामुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे जवळपास सर्वांचेच वजन वाढले. आता वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा अत्यंत फायदेशीर, वाचा!
वाढलेले वजन
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांचे वजन वाढले आहे. लाॅकडाऊनमुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे जवळपास सर्वांचेच वजन वाढले. आता वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार सर्वात महत्वाचा आहे. आपण आपल्या आहारामध्ये मेथीचा चहाचा समावेश करू शकता. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. (Fenugreek tea is extremely beneficial for weight loss)

वजन कमी करण्यासाठी दिवसातून मेथीची चहा चार ते पाच वेळा आपण घेऊ शकतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मेथीचा चहा तयार करण्यासाठी मेथी रात्रीच पाण्यामध्ये भिजू घाला. त्यानंतर ज्यावेळी आपल्याला हा चहा प्यायचा आहे. त्यावेळी हे गरम करा आणि गाळून घेऊन प्या. हा चहा आपण नियमित घेतला तर आपले वजन लवकर कमी होईल आणि चरबी बर्न होईल. मात्र, मेथीचा चहा घेत असताना व्यायाम करणे देखील महत्वाचे आहे. ज्यामुळे वजन झटपट कमी होईल.

मेथीचा चहा फक्त वजन कमी करण्यासाठीच नाहीतर आपल्या आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हा चहा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतो. मेथीमध्ये अँटासिड असतात. जे शरीरात अॅसिड रिफ्लेक्ससारखे कार्य करते. मेथीचा चहा पोटातील अल्सरची समस्या देखील दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यात भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्ठतेपासून आराम देते. मेथीचा चहा घेतल्याने झोप न घेण्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. यामुळे आपण दररोज आपल्या आहारामध्ये मेथीच्या चहाचा समावेश करावा.

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. जिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Fenugreek tea is extremely beneficial for weight loss)