योगा केल्यानंतर कसा असावा डाएट? जाणून घ्या सविस्तर माहिती…

अनेकांच्या मते रिकाम्या पोटी व्यायाम करावा, पोटात अन्न असताना व्यायाम केल्यास ते शरीराला अपायकारक असल्याचे सांगण्यात येत असते. तर काहींच्या मते योगा तसेच इतर व्यायाम करण्याअगोदर शरीराला उर्जा मिळण्यासाठी पोटात काही तरी असायला पाहिजे, या मागील खरं कारण काय, ते जाणून घेउया...

योगा केल्यानंतर कसा असावा डाएट? जाणून घ्या सविस्तर माहिती...
योगा
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:28 AM

शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी तज्ज्ञांकडून आपणास नियमित व्यायामाचा (Exercise) सल्ला देण्यात येत असतो. त्यातच योगा केल्याने शरीर व मन दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदत होत असते. धावपळीच्या युगात शरीराची उर्जा टिकवून ठेवणे महत्वाचे असते. नियमित पुरेशी झोप, सकस आहार आणि व्यायाम हे निरोगी आरोग्याचे सूत्र आहे. नियमित योगा तसेच इतर व्यायाम केल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहून आयुर्मानदेखील वाढत असते. विविध योगासने करीत असताना एक नेहमीचा प्रश्‍न निर्माण होत असतो. योगा करण्याच्या आधी व नंतर नेमका आहार कसा असावा, योगा (yoga) करतेवेळी पोट रिकामे असावे की काही तरी खाल्लेले असावे? या लेखात तुम्हाला सर्व प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे मिळण्यास मदत होणार आहे.

1) हलका नाश्‍ता करावा

आपण साधारणत: सकाळी योगासने करीत असतो. अशा वेळी साधारणत: अडीच तास आधी नाश्ता करणे कधीही योग्य असते. सकाळचा नाश्ता हलका असावा. नाश्‍तामध्ये पोहे किंवा ओट्स, उपमा, इडली आदींचा वापर करु शकतो.

2) हायड्रेड रहा

कुठलाही व्यायाम करताना घाम निघत असतो. अशा वेळी शरीराला पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी आपण व्यायाम किंवा योगा करताना शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. व्यायामादरम्यान घाम आल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

3) फायबरयुक्त फळे खा

व्यायाम करण्याआधी पचायला जड असलेले अन्न खाणे टाळावे, आहारात सफरचंद, केळी सारख्या जास्त फायबर असलेल्या फळांचा समावेश केल्यास पचनक्रिया वाढते. केळी खाल्ल्याने शरीरात ऊर्जाही राहते. योग करताना जडपणा जाणवण्याची समस्या असल्यास दोन तास आधी काहीही खाउ नये.

4) नंतर काय खावे

योगासने केल्यानंतर आपल्या आहारात दूध आणि तृणधान्यांचा समावेश करु शकतात. व्यायाम केल्याने शरीर काही प्रमाणात दमलेले असते. त्यामुळे शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी पालेभाज़्या, फळे तसेच अंडी आपल्या आहारात समाविष्ठ करु शकतात.

संबंधित बातम्या : 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवाचीये? मग ‘या’ पदार्थांचे आवश्य सेवन करा

मुलांना हेल्दी, गुबगुबीत आणि उंच बनवायचं असेल तर मुलांना ब्रोकोली राइस द्यायलाच हवा!

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.