AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘या’ सवयींचे पालन करा, वजन झपाट्याने कमी होईल!

वाढत्या लठ्ठपणामुळे आजारांचा धोका वाढतो. वाढते वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो. पण त्याचा परिणाम इतक्या लवकर दिसत नाही. ज्यामुळे आपण अनेक वेळा निराश होतो.

Weight loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'या' सवयींचे पालन करा, वजन झपाट्याने कमी होईल!
निरोगी आहार
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 10:54 AM
Share

मुंबई : वाढत्या लठ्ठपणामुळे आजारांचा धोका वाढतो. वाढते वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो. पण त्याचा परिणाम इतक्या लवकर दिसत नाही. ज्यामुळे आपण अनेक वेळा निराश होतो. वजन कमी करणे ही एक लांब प्रक्रिया आहे. ज्यासाठी संयम आवश्यक आहे. व्यायामाबरोबरच वजन कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. सकाळी काही सवयी अंगीकारल्यास वजन कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया या सवयींबद्दल. (Follow these habits to lose weight)

उच्च प्रथिन्येयुक्त नाश्ता

प्रथिने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नाश्त्यामध्ये जास्त प्रथिने खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. अनेक अभ्यासामध्ये असा दावा केला गेला आहे, की उच्च प्रथिने नाश्ता केल्याने वारंवार जेवणाची लालसा कमी होते. उच्च प्रथिने घ्रेलीन हार्मोनचे प्रमाण कमी करते.

अधिक पाणी प्या

रोज सकाळी उठून एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पाणी शरीरातील ऊर्जा वाढवते आणि 60 मिनिटे कॅलरी बर्न करण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार, 500 मिली पाणी पिल्याने चयापचय दर 30 टक्क्यांनी वाढतो. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. याशिवाय भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.

व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी, दररोज सकाळी उठून व्यायाम करा. सकाळी व्यायाम केल्याने साखर नियंत्रणात राहते. हे तुम्हाला इतर प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी उठून व्यायामाची सवय लावा.

दुपारचे जेवण महत्वाचे 

निरोगी जीवनशैलीसाठी वेळेवर खाणे खूप महत्वाचे आहे. दुपारच्या जेवणात प्रथिने आणि फायबर जास्त घ्या आणि कार्बोहायड्रेट कमी करा. आरोग्य तज्ञांच्या मते, जेवण नियोजन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. दुपारच्या जेवणासाठी घरगुती अन्न खा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी निरोगी आहार खूप फायदेशीर आहे.

पायी चालण्यावर भर द्या

आम्ही आमच्या प्रवासासाठी सोयीस्कर वाहने वापरतो. ऑफिसला जाताना सार्वजनिक वाहतूक आणि सायकल वापरता येते. अभ्यासात असे आढळून आले आहे की. जे लोक कारने प्रवास करतात, ते अधिक लठ्ठ असतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Follow these habits to lose weight)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ