Healthy diet : निरोगी राहण्याचा एकच फंडा…संतुलित आहार घ्या आणि कॅलरीज मोजत राहा, वाचा अधिक!

जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी (Body healthy) ठेवायचे असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम आणि खाण्यावर चांगले लक्ष द्यावे लागते. म्हणूनच खाणे खूप महत्वाचे आहे. मात्र, आपण दिवसभरात आणि कोणत्या वेळी काय खातो यावर आपले सर्व काही अवलंबून असते.

Healthy diet : निरोगी राहण्याचा एकच फंडा...संतुलित आहार घ्या आणि कॅलरीज मोजत राहा, वाचा अधिक!
निरोगी राहण्यासाठी हा डाएट फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 11:27 AM

मुंबई : जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी (Body healthy) ठेवायचे असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम आणि खाण्यावर चांगले लक्ष द्यावे लागते. म्हणूनच खाणे खूप महत्वाचे आहे. मात्र, आपण दिवसभरात आणि कोणत्या वेळी काय खातो यावर आपले सर्व काही अवलंबून असते. पण अन्नाचे पौष्टिक मूल्य देखील खूप महत्वाचे आहे. खायला सगळ्यांनाच आवडते. मात्र, आपण काय खात आहोत, हे सर्वात महत्वाचे (Important) आहे. बरेच लोक भूक लागली की, आॅफिसच्या बाहेर पडतात आणि फास्ट फूड (Fast food) खातात. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायकच आहे.

कॅलरीज मोजणे खूप जास्त महत्वाचे

कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या सुरू होतात. त्यामध्ये विशेष करून वाढणारे वजन. जेवणाच्या वेळी कॅलरीज मोजणे खूप जास्त महत्वाचे आहे. म्हणजे आपल्याला समजते की, आपण किती कॅलरीज घेतल्या आहेत आणि आपल्याला किती कॅलरीज बर्न करायच्या आहेत. तसेच, निरोगी आणि संतुलित आहार घ्या. तुम्ही खात असलेल्या अन्नामध्ये पुरेशी पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळत आहेत का?, हे नेहमीच चेक करायला हवे.

या पदार्थांचा आहारात समावेश कराच

जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असलेला आहार घ्या. तसेच भाज्या, प्रथिने, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ यांचा देखील आहारात समावेश असायला हवाच. रोजच्या आहारात फळांचा समावेश जरूर करा. विविध हंगामी फळे खा. विशेष: हंगामी फळे खाण्यावर अधिक भर द्या. भाज्यांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अँटिऑक्सिडंट्सचा मुख्य स्त्रोत भाज्या असतात. ब्रोकोली, मटार समाविष्ट यांचा आहारात नेहमीच समावेश असावा.

याप्रमाणे आपला डाएट ठरवा!

निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्वाचा असतो. आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये काय घेतो यावर आपल्या शरीराची ऊर्जा ठरलेली असते. शक्यतो नाश्त्यामध्ये तेलकट आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे टाळाच. रात्री भिजवलेली कडधान्य, अंडी, भाज्यांचे आणि फळांचे ज्यूस सुकामेवा यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश असावा. तसेच निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा देखील महत्वाचा आहे. यासाठी दररोज सकाळी किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा.

(वरील टिप्स फाॅलो करताना डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :  

Health : उन्हाळ्यात या ज्यूस आणि स्मूदीचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!

Disadvantages : अंडी खाण्याचे शाैकिन आहात?, जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.