Health Care : ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Aug 01, 2021 | 5:42 PM

आपल्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. हाडांसाठी कॅल्शियमचे महत्त्व वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम एक आवश्यक खनिज आहे.

Health Care : या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, वाचा याबद्दल अधिक!
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मुंबई : आपल्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. हाडांसाठी कॅल्शियमचे महत्त्व वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम एक आवश्यक खनिज आहे. कॅल्शियम हाडे बनवते. हाडे मजबुत करण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण हाडांना मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमची गरजेचे असते. (Include calcium rich foods in your diet)

आपली हाडे निरोगी आणि मजबूत होण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
कॅल्शियम व्यतिरिक्त, नट्समध्ये प्रथिने, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम देखील असतात. जे हाडे मजबूत करण्यात मदत करतात. अक्रोड, शेंगदाणे, बदाम आणि पीकन्स सारखे नट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात. जे तुमची हाडे निरोगी बनवण्यात मदत करतात. व्हिटामिन डीसाठी सूर्य किरण हा उत्तम स्त्रोत मानला जातो. तथापि, माशाच्या सेवनातून देखील व्हिटामिन डी मिळवता येतो. व्हिटामिन डी काही प्रकारच्या माशांमध्ये आढळते. जसे की, सॅमन, ट्यूना आणि रेनबो ट्राउट या माशांमध्ये व्हिटामिन डी आढळते.

पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. हे निरोगी हाडे टिकवून ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने हाडे लवकर कमकुवत आणि नाजूक होत नाहीत. मात्र, पनीर नेहमी योग्य प्रमाणातच सेवन करावे. यामध्ये सोडियम आणि चरबी देखील जास्त असते. त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. जर आपण फॅट-फ्री कॉटेज चीज अर्थात पनीर घेत असाल, तर लक्षात ठेवा की त्यात व्हिटामिन डी सारख्या व्हिटामिनचे प्रमाण जास्त आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include calcium rich foods in your diet)