वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करा!

औषधी वनस्पतींमध्ये त्रिफळा अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. त्रिफळा आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. रात्री झोपताना त्रिफळाची बारीक पावडर खाऊन झोपा. मात्र, ही जेवण केल्यानंतर दोन तासांनी खावी. तसेच सकाळी नाश्त्या झाल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये त्रिफळा पावडर मिक्स करून प्या.

वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करा!
Image Credit source: blog.nasm.org
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:41 AM

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे आज खूप लोक त्रस्त आहेत. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी जिम, रनिंग, झुम्बा, योगा आणि विविध प्रकारचे डाएट केले जातात. मात्र, हे करूनही अनेकांचे वजन कमी होत नाही. कारण सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण सतत बाहेरचे तेलकट आणि तूपकट खाद्यपदार्थांचे सेवन करतो. तसेच बैठे काम वाढले आहे. यामुळे आपल्या कॅलरीज बर्न (Burn calories) होत नाही. परिणामी वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. मात्र, शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण नियमितपणे काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा आहारात समावेश करायला हवा. ज्यामुळे चरबी बर्न होण्यास मदत होते. या आयुर्वेदिक औषधी वनस्पती चयापचय चांगले करण्यास मदत करतात. विशेष म्हणजे औषधी वनस्पतींमुळे (Herbs) बऱ्याच काळ आपल्याला भूक देखील लागत नाही. तसेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि वजन कमी होते. या आयुर्वेदिक औषधी वनस्पती नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

त्रिफळा

औषधी वनस्पतींमध्ये त्रिफळा अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. त्रिफळा आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. रात्री झोपताना त्रिफळाची बारीक पावडर खाऊन झोपा. मात्र, ही जेवण केल्यानंतर दोन तासांनी खावी. तसेच सकाळी नाश्त्या झाल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये त्रिफळा पावडर मिक्स करून प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

दालचिनी

दालचिनी हा असा मसाला आहे, जो अन्नाची चव वाढवण्यास मदत करतो. दालचिनी वजन कमी करण्यास अत्यंत गुणकारी वनस्पती देखील आहे. दालचिनी शरीरातील चयापचय चांगला करते. यामुळे आपल्या पोटावरील चरबी झपाट्याने कमी होते. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा चहा देखील आहारामध्ये घेऊ शकता. मात्र, दालचिनीच्या चहामध्ये कधीही साखर घालू नका. त्याऐवजी तुम्ही गूळ किंवा मध टाका.

हळद

हळद हा प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये मिळणारा मसाला आहे. जवळपास सर्वच पदार्थांमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीच्या सेवनाने वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून प्यावी. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मेथी

मेथी वजन कमी करण्यासाठी मदत करते. आपण जर मेथीचे सेवन केले तर बऱ्याच वेळ भूकही लागत नाही. तसेच यामुळे अतिरिक्त खाण्याची लालसा देखील कमी होते. मेथी शरीरातील चयापचय गतीमान करते. यासाठी आपण रात्री पाण्यामध्ये मेथी भिजत ठेवावी. त्यानंतर ही मेथी कोमट पाण्यामध्ये टाका आणि याचे सेवन करा. तसेच मेथीची बारीक पावडर करा आणि भूक लागली की खा.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.