AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Immunity Booster: व्हिटॅमिन-सी भरपूर मिळेल; ‘या’ 7 ड्रिंक्स प्या आणि इम्युनिटी वाढवा!

आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि इतर अनेक आरोग्याच्या फायद्यासाठी ओळखले जाते. हे आपली त्वचा सुधारण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादन उत्तेजित करू शकते.

Immunity Booster: व्हिटॅमिन-सी भरपूर मिळेल; 'या' 7 ड्रिंक्स प्या आणि इम्युनिटी वाढवा!
रोगप्रतिकारक शक्ती
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि इतर अनेक आरोग्याच्या फायद्यासाठी ओळखले जाते. हे आपली त्वचा सुधारण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादन उत्तेजित करू शकते. आपण आपल्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन सी समृध्द अन्न समाविष्ट करू शकता. (Include these 7 drinks in your diet to boost your immune system)

हर्बल टी – हर्बल टीला गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रियता मिळाली आहे. व्हिटॅमिन सी युक्त एक कप हर्बल टी बनवण्यासाठी तुम्ही त्यात पुदीना, धणे सारखे पदार्थ घालू शकता. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून ओळखले जाते. ते मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

फळांचा रस – ताज्या फळांचा रस आरोग्यासाठी चांगला आहे. हे आपल्याला केवळ ताजेतवानेच ठेवत नाही तर आपल्याला अनेक आवश्यक पोषक तत्त्वे देखील प्रदान करते. टरबूज, संत्रा, हंगामी फळे, लीची आणि अननसापासून बनवलेले रस तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. ते व्हिटॅमिन सी समृद्ध आहेत. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

मिल्कशेक – मिल्कशेक प्रथिने आणि कॅल्शियम समृध्द आहे. तुम्ही त्यात स्ट्रॉबेरी, आंबा, सफरचंद किंवा किवीसारखी फळेही घालू शकता. ते व्हिटॅमिन सी समृद्ध आहेत. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

अननसाचे पन्ने – अननस व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, निरोगी हाडे वाढवते आणि पचन सुधारते. घरी अननस पन्ने बनवा. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

लिंबूपाणी – लिंबाचे पाणी तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. हे पेय आपल्याला चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील मदत करू शकते. यासाठी तुम्हाला पाण्यात लिंबू पिळून घ्यावे लागेल, थोडे मीठ आणि साखर घालावी लागेल. हे व्हिटॅमिन सी समृद्ध पेय आहे.

मँगो सूप – ही एक अतिशय चवदार डिश आहे. आंब्याचा लगदा, पिकलेले टोमॅटो, लिंबू वापरून बनवले जाते. हे सर्व व्हिटॅमिन सी समृद्ध आहेत. हे सूप तुमच्या त्वचेला चमकदार बनवू शकते. तसेच तुमचे पचन सुधारते.

हिरव्या भाज्यांचा सूप – भाज्यांसह सूप सहज बनवता येतो. पण तुम्हाला माहित आहे का पालक, ब्रोकोली, कोबी, फुलकोबी या भाज्या व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत आहेत. ते आपली हाडे मजबूत करण्यास आणि पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

संबंधित बातम्या 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Include these 7 drinks in your diet to boost your immune system)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.