Health Tips : ताण कमी करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी आहारात ‘या’ 8 सुपरफूडचा समावेश करा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 26, 2021 | 10:30 AM

प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार केल्याने आपला ताण वाढतो. ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. यामुळे तुमचा मूड खराब राहतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल की मूड सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुपरफूड समाविष्ट करू शकता. या गोष्टी खाल्ल्याने तुमचा मूड सुधारतो.

Health Tips : ताण कमी करण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी आहारात 'या' 8 सुपरफूडचा समावेश करा!
आहार
Follow us

मुंबई : आजची व्यस्त जीवनशैली आणि तणावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. जास्त वेळ काम करणे, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण तुमच्या कामावर तसेच वैयक्तिक जीवनावर परिणाम करतो. त्याचा प्रभाव तुमच्या स्वभावातही दिसून येतो. कोणाशी न बोलणे, चिडचिडेपणा, ऑफिसमध्ये सहकार्याने न बोलणे या गोष्टी वाढू लागतात. (Include these 8 foods in your diet to reduce stress)

प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार केल्याने आपला ताण वाढतो. ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. यामुळे तुमचा मूड खराब राहतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल की मूड सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुपरफूड समाविष्ट करू शकता. या गोष्टी खाल्ल्याने तुमचा मूड सुधारतो. तसेच तणाव दूर ठेवण्यास मदत होते. चला या सुपरफूड बद्दल जाणून घेऊया.

डॉर्क चॉकलेट

डॉर्क चॉकलेट ट्रिप्टोफॅनने समृद्ध असते. त्याचा वापर आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिनचे उत्पादन वाढवण्यास केला जातो. सेरोटोनिन हा एक प्रमुख हार्मोन आहे. जो आपला मूड सुधारण्यास मदत करतो.

ग्रीन टी

ग्रीन टीचा वापर वजन कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी केला जातो. ग्रीन टीमध्ये कॅटेचिनसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूचे कार्य वाढवण्यास मदत करतात. हे व्यक्तीला सतर्क राहण्यास मदत करते. त्यात कॅफीन असते जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

शिमला मिरची

शिमला मिरची व्हिटॅमिन ए आणि बी -6 ने समृद्ध आहे. जे मेंदूचा विकास वाढविण्यात मदत करते. शरीराला सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिन हार्मोन्स तयार करण्यास मदत करते.

ओमेगा -3

ओमेगा -3 हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. यात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. सॅल्मन, फ्लेक्ससीड्स, चिया बियाणे आणि शेंगदाणे ओमेगा -3 मध्ये समृद्ध असतात. आंबलेले अन्न

निरोगी आतड्यासाठी आंबवलेले अन्न खूप महत्वाचे आहे. यात प्रोबायोटिक बॅक्टेरिया भरपूर असतात. ताक, सायरक्राट, मिसो, लोणचे, भाज्या, दही यांसारखे पदार्थ प्रोबायोटिक्समध्ये समृद्ध असतात. या गोष्टी सेरोटोनिनमध्ये समृद्ध असतात

सुकामेवा

सुकामेवामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होते. मॅग्नेशियम कमी झाल्यामुळे नैराश्याचा धोका वाढतो.

हिरव्या भाज्या

पालक, मेथीमध्ये व्हिटॅमिन बी फोलेट असते. ज्याची कमतरता सेरोटोनिन, डोपामाइन सारख्या महत्त्वाच्या न्यूरोट्रांसमीटरच्या चयापचयात अडथळा आणते.

कॅफीन

कॅफीन तुमचा मूड सुधारण्यास मदत करते. हे आपल्या शरीरात डोपामाइन ट्रिगर करून मूड सुधारण्यास मदत करते. यामुळे आपण दिवसातून किमान एकदा काॅफीचे सेवन केले पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these 8 foods in your diet to reduce stress)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI