Boost Immunity : बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पेयांचा आहारात समावेश करा!

हिवाळा आला आहे आणि बदलत्या ऋतूत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत मजबूत प्रतिकारशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता.

Boost Immunity : बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' खास पेयांचा आहारात समावेश करा!
आरोग्य

मुंबई : हिवाळा आला आहे आणि बदलत्या ऋतूत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत मजबूत प्रतिकारशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता. तुम्ही हे पेय घरीच बनवू शकता.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा पदार्थ असतो. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. विशेषतः हिवाळ्यात दूध किंवा चहामध्ये चिमूटभर हळद टाकल्याने सांधेदुखी, अंगदुखी आणि स्नायूंची सूज दूर होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, त्याचे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

हळदीचे दूध बनवण्यासाठी 1 कप दूध गरम करून 1/2 कप पाणी घालून दूध पातळ करा, त्यात चिमूटभर हळद, चिमूटभर काळी मिरी किंवा गोड आवडत असल्यास थोडी साखर घालू शकता. परंतु, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर साखर मिक्स करणे टाळा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी हे खास पेय प्या.

पालक आणि एवोकॅडो स्मूदी

अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि आयर्नने समृद्ध ही स्मूदी घरच्या घरी बनवा. एक ब्लेंडर घ्या, त्यात 1 कप धुतलेली पालक पाने आणि अर्धा एवोकॅडो घाला, चांगले मिसळा आणि अर्धा लिंबाचा रस, खडे मीठ आणि काळी मिरी घाला. हे पेय केवळ तुम्हाला पोषकच नाही तर लोह आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करेल आणि रक्त परिसंचरण सुधारेल.

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस घरी तयार करण्यासाठी 4-5 आवळे घ्या, त्यांचे लहान तुकडे करा, बिया काढून टाका. एक कप पाण्यात मिसळा. त्यात 1 चिमूट काळी मिरी, 1 चिमूट रॉक मीठ, 1 टेबलस्पून लिंबाचा रस घाला. जर तुम्हाला ते थोडे गोड करायचे असेल तर तुम्ही त्यात मध घालू शकता.

हे मिश्रण बनवून सकाळी प्या. आवळ्याचा रस अमीनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते. हे विष बाहेर टाकण्यास मदत करते. आवळा चयापचय सुधारण्यास मदत करते आणि जलद वजन कमी करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

 

Published On - 11:08 am, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI