Food : घरच्या-घरी तयार करा खास शाही पनीर, पाहा रेसिपी!

शाही पनीर हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. या पनीर रेसिपीच्या चवमुळे ते जवळजवळ प्रत्येक रेस्टॉरंट आणि ढाब्याच्या मेनूमध्ये असते. ही क्रीमी शाही पनीर रेसिपी भात, चपाती, नान किंवा पराठ्यासोबतही खाता येते. शाही पनीर तयार करण्यासाठी पनीर, दही आणि सुका मेवा लागतो.

Food : घरच्या-घरी तयार करा खास शाही पनीर, पाहा रेसिपी!
शाही पनीर
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 10:32 AM

मुंबई : शाही पनीर हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. या पनीर रेसिपीच्या चवमुळे ते जवळजवळ प्रत्येक रेस्टॉरंट आणि ढाब्याच्या मेनूमध्ये असते. ही क्रीमी शाही पनीर रेसिपी भात, चपाती, नान किंवा पराठ्यासोबतही खाता येते. शाही पनीर तयार करण्यासाठी पनीर, दही आणि सुका मेवा लागतो, ज्यात प्रामुख्याने काजू आणि बदाम यांचा समावेश होतो. शाही पनीरची खासियत म्हणजे त्यात मसाले आणि मलई वापरली जाते. ज्यामुळे ते आधिक चवदार होते. चला जाणून घेऊयात घरच्या-घरी शाही पनीर कसे तयार करायचे.

शाही पनीरचे साहित्य

500 ग्रॅम पनीर

1 इंच आले

3 हिरव्या वेलची

1 टीस्पून लाल मिरची

1 टीस्पून गरम मसाला पावडर

1/2 कप टोमॅटो प्युरी

आवश्यकतेनुसार पाणी

1/2 कप बदाम

2 कांदे

3 हिरव्या मिरच्या

1/2 कप दही

6 चमचे तूप

1 कप दूध

आवश्यकतेनुसार मीठ

1/2 कप काजू

1 मूठभर कोथिंबीर

1/4 कप फ्रेश क्रीम

शाही पनीर कसे बनवायचे?

स्टेप 1-

ही क्रीमी शाही पनीर रेसिपी बनवण्यासाठी कांदे, हिरवी मिरची, टोमॅटो सोबत आले आणि कोथिंबीर वेगवेगळे चिरून घ्या. आता एका भांड्यात दही टाका आणि चांगले फेटून घ्या.

तुम्ही चिरलेल्या टोमॅटोऐवजी टोमॅटो प्युरी देखील वापरू शकता. ही रेसिपी अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही मसाले वेगळे भाजून ग्रेव्हीमध्ये घालू शकता.

यामुळे तुमची रेसिपी आणखी चवदार होईल. आता थोडेसे पाणी वापरून काजू आणि बदाम वेगवेगळे बारीक करून घ्या आणि काजू आणि बदामाची पेस्ट बनवा.

स्टेप 2-

यानंतर कढई मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात 3 चमचे तूप गरम करा. 4 ते 5 मिनिटे चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची आणि हिरवी वेलची घाला.

टोमॅटो प्युरी घाला आणि झाकण ठेवा. सुमारे 8 ते 10 मिनिटे शिजवा. नंतर त्यात फेटलेले दही घालून 5 मिनिटे शिजवा आणि पॅनमध्ये एक कप पाणी घाला.

आणखी 2 मिनिटे शिजवा. ग्रेव्ही शिजल्यावर थंड होऊ द्या. पुरेसं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाका आणि गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत बारीक करा आणि बाजूला ठेवा.

स्टेप 3-

आता उरलेले तूप दुसर्‍या पॅनमध्ये गरम करून त्यात लाल तिखट, गरम मसाला पावडर, काजू आणि बदामाची पेस्ट आणि ग्राउंड ग्रेव्हीसह मीठ घाला. ते उकळवा नंतर पनीरचे चौकोनी तुकडे आणि दूध घाला. आणखी 3 ते 5 मिनिटे शिजवा.

जर तुम्हाला ते क्रीमी आवडत असेल तर तुम्ही ताजे क्रीम घालू शकता. यामुळे तुमची डिश चविष्ट तर होईलच शिवाय चवही वाढेल. रूमाली रोटी किंवा नान सोबत गरमागरम सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Make shahi paneer at home, see recipe)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.