Quinoa Benefits : घरच्या-घरी तयार करा हे स्वादिष्ट क्विनोआ कटलेट, जाणून घ्या रेसिपी!

Quinoa Benefits : घरच्या-घरी तयार करा हे स्वादिष्ट क्विनोआ कटलेट, जाणून घ्या रेसिपी!
कटलेट

सध्याच्या थंडगार वातावरणामध्ये आपल्याला हेल्दी आणि चवदार काही तरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण क्विनोआ कटलेटचा (Quinoa Benefits) आहारामध्ये समावेश करू शकतो. ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 11, 2021 | 9:34 AM

मुंबई : सध्याच्या थंडगार वातावरणामध्ये आपल्याला हेल्दी आणि चवदार काही तरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण क्विनोआ कटलेटचा (Quinoa Benefits) आहारामध्ये समावेश करू शकतो. ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. यासाठी आपल्याला क्विनोआ, कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी, बेसन आणि काही मसाले लागणार आहेत. चला तर जाणून घेऊयात घरच्या-घरी हेल्दी आणि चवदार क्विनोआ कटलेट कसे तयार करायचे.

क्विनोआ कटलेटचे साहित्य

1 कप क्विनोआ

1 शिमला मिरची

1 कप किसलेली कोबी

1 गाजर

3 चमचे बेसन

1 टीस्पून धने पावडर

आवश्यकतेनुसार मीठ

1 चमचे तेल

1 टीस्पून लाल तिखट

2 चमचे कोथिंबीर

1 कप कांदा

क्विनोआ कटलेट तयार करण्याची पध्दत-

स्टेप 1-

क्विनोआ 30 मिनिटे भिजत ठेवा. आता ते चांगले धुवा आणि जाड पेस्ट तयार करण्यासाठी ब्लेंडरमध्ये ठेवा. आवश्यक असल्यास, 1-2 चमचे पाणी घाला.

स्टेप 2-

क्विनोआ पेस्ट एका भांड्यात काढा. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी आणि कोथिंबीर घाला. बेसन, मीठ, धनेपूड आणि लाल तिखट घाला. मिश्रण घट्ट तयार करा.

स्टेप 3-

आता नॉन-स्टिक तव्यावर एक चमचा तेल टाका आणि गरम होऊ द्या. मिश्रणापासून लहान टिक्की बनवा आणि पॅनमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. सर्व कटलेट्स व्यवस्थित शिजल्यावर गरमा-गरम सर्व्ह करा.

क्विनोआची फायदे-

क्विनोआ जलद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. जर क्विनोआ दररोज सकाळी रिकाम्या पोटी सॅलडच्या रूपात खाल्ल्यास बराच वेळ पोट भरलेले राहते. यामुळे दररोज सकाळी क्विनोआचा आहारात समावेश करा.

क्विनोआमध्ये प्रथिने आणि अमीनो अॅसिड सारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी काम करतात. वृद्ध लोकांसाठी हे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यात मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असते. हे ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें