Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हा’ चहा गुणकारी, वाचा!

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, पुदीना खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'हा' चहा गुणकारी, वाचा!
पुदीना आणि तुळस
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 7:04 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, पुदीना खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. यासह, हे पोटात होणार्‍या बर्‍याच समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. विशेष म्हणजे दररोज सकाळी आपण पुदीन्याचा चहा पिला तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Peppermint Tea is beneficial for weight loss)

पुदीन्याचा चहा आपण दररोज सकाळी घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. हा चहा तयार करण्यासाठी सात ते आठ पुदीन्याची पाने घ्या आणि एक ग्लास पाण्यात उकळण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यानंतर यामध्ये मध आणि लिंबू मिक्स करा. साधारण दहा मिनिटांसाठी हे पाणी उकळूद्या आणि गरम असतानाच प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळतात. या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील गॅस देखील काढून टाकता येतो. तसेच, साठलेल्या कफावर देखील पुदिना उपयुक्त आहे. कारण, पुदीना गरम प्रभावाचा आहे, ज्यामुळे तो शरीरातून घाम काढून ताप काढून टाकतो. आपल्याला एखादा किडा चावल्यास, त्याचे विष काढून करण्याचे गुणधर्म देखील पुदीन्यामध्ये आहेत.

पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीना सर्वोत्तम मानला जातो. आजकाल खाण्यापिण्यामुळे पोटात बऱ्याच समस्या उद्भवतात. यासाठी एक चमचा पुदीना रसामध्ये, एक कप कोमट पाणी आणि एक चमचा मध मिसळा. याच्या सेवनाने पोटातील आजारांपासून आराम मिळतो. मसालेदार अन्न खाल्ल्याने बर्‍याचदा अपचन आणि पोटदुखी होते. अशा अवस्थेत पुदीना उकळवून त्यात मध घालून प्यायल्यास पोटाचा त्रास कमी होतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Peppermint Tea is beneficial for weight loss)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.