वेट मॅनेजमेंट हा लठ्ठपणावरील एकमेव पर्याय नाही, झपाट्याने वाढणारी आरोग्य समस्या देतेय धोक्याचा इशारा!

लोकांनी न्यू नॉर्मल जीवनशैली आत्मसात केली असली तरीही वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल शिक्षण पद्धतीने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये  तणावामुळे अति खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत.

वेट मॅनेजमेंट हा लठ्ठपणावरील एकमेव पर्याय नाही, झपाट्याने वाढणारी आरोग्य समस्या देतेय धोक्याचा इशारा!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 4:44 PM

मुंबई : लोकांनी न्यू नॉर्मल जीवनशैली आत्मसात केली असली तरीही वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल शिक्षण पद्धतीने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये  तणावामुळे अति खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. कोविड उद्रेकाने प्रत्येकाला चांगले आरोग्य, आहार आणि बळकट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत पाहिजे आहे. त्यामुळे सुदृढता राखण्यावर तसेच घरीच आरोग्याची देखरेख ठेवण्याकडे कल दिला पाहिजेत. (Weight management is not the only option for obesity)

भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान विकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. याचा अर्थ आपल्या लोकसंख्येच्या 30% व्यक्ती लठ्ठ असू शकतात. आयसीएमआर-इंडियाबी’ ने 2015 दरम्यान केलेल्या अभ्यासानुसार 135 दशलक्ष व्यक्ती लठ्ठपणा आणि वजन व्यवस्थापन समस्येने त्रस्त आहेत.

डिसेंबर 2020 दरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या 5 व्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्व्हेक्षणानुसार, बहुसंख्य महिला लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये ही आरोग्य समस्या वेगाने वाढते आहे. ओमरॉन हेल्थकेअर इंडिया’ चे एमडी. मसानोरी मत्सुबारा म्हणाले की, “लठ्ठपणाच्या समस्यांचे जीवनशैली विषयक विकारांशी मजबूत संबंध आहे. ज्यामुळे आपल्या आरोग्यनिगा यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. प्रामुख्याने वैयक्तिक स्तरावर प्रतिबंधात्मक आरोग्यनिगा व्यवस्थापन काळाची गरज असल्याचा निष्कर्ष यातून निघतो.

मसानोरी मत्सुबारा 1

ओमरॉन हेल्थकेअर इंडिया एमडी मसानोरी मत्सुबारा यांनी ही माहिती दिली

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणा तपासण्याकरिता वजन व्यवस्थापन हा मुख्य निकष असल्याचे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते. मात्र ते पुरेसे नाही. आपले बीएमआय, शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी इतर अनेक सूचक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे महत्त्वाचे ठरते. आता हे घटक सहज आरामात घरबसल्या मोजणे शक्य आहे. बॉडी कम्पोजीशन मॉनिटर्स’ सारख्या देखरेख उपकरणामुळे हे शक्य होते.” बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) म्हणजे शरीराच्या घनतेवरून लठ्ठपणाचा वेध घेता येतो.

यामध्ये शरीरातील चरबी आणि गंभीर आरोग्य जोखमीचे चांगले सूचकबिंदू अंदाज नोंदवतात. भारतात शरीराचा बीएमआय 30 किंवा त्याच्यावर असल्यास लठ्ठपणा आणि 25-30 बीएमआय असल्यास अति वजन असण्यावर शिक्कामोर्तब होतो. आपल्या शरीरात कमरेच्या खालच्या भागातील अवयवांच्या भोवती जमलेली चरबी म्हणजे बीएमआय संबंधी चरबी असे म्हणतात. उच्च बीएमआय आणि सभोवती साठलेली चरबी म्हणजे हृदय रोग, उच्च रक्त दाब, श्वसनाच्या समस्या आणि अन्य विकारांना आमंत्रित करणारी भयंकर जोखीम ठरते.

या सूचकांची माहिती आणि या घटकांचे व्यवस्थापन केल्याने अधिक प्रभावीपणे वजन व आरोग्य व्यवस्थापन शक्य होते. ओमरॉन’ च्या वतीने बॉडी कंपोजिशन मॉनिटर्स सादर करण्यात आले. ज्याद्वारे उपभोक्त्याला त्याच्या एकंदर आरोग्याचे बीएमआय, घनतेच्या सभोवती जमलेली चरबी, सांध्यांचे स्नायू आणि तत्सम घटक काही सेकंदांत अगदी सहज जाणून घेणे शक्य होते. हे उपकरण अभिनव आणि उद्योग क्षेत्रातील एकमेव जपानी फोर पॉइंट, एट सेन्सर- आधारीत फूल बॉडी सेन्सिंग टेक्नोलॉजीने युक्त आहे.

याशिवाय त्यात ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हीटी असल्याने उपकरणातून जमवलेली माहिती थेट ओमरॉन कनेक्ट अॅपवर पाठवता येते. डब्ल्यूएचओ अनुसार जगभरात 1975 पासून लठ्ठपणा वाढण्याच्या वारंवारतेत 3 पटीने वृद्धी झाली. 2016 च्या आकडेवारी अनुसार, 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 1.9 अब्जहून अधिक प्रौढ अति वजनदार तर त्यापैकी सुमारे 650 दशलक्ष लठ्ठ होते. 2020 च्या आकडेवारीनुसार 5 पेक्षा खालील वयाची जवळपास 39 दशलक्ष बालके लठ्ठ आढळून आली.

संबंधित बातम्या :

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Weight management is not the only option for obesity)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.