AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय प्या!

वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्ने केले जातात. मात्र, म्हणावे तसे वजन कमी होत नाही.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय प्या!
खास पेय
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 16, 2021 | 7:04 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्ने केले जातात. मात्र, म्हणावे तसे वजन कमी होत नाही. बरेचजन वजन कमी करण्यासाठी अन्न खाणे टाळतात. दिवस-दिवस उपाशी राहतात. मात्र, एवढे सर्व करूनही वजन काही कमी होत नाही. आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. (Cumin, coriander and saunf are beneficial for weight loss)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी, जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपण 2 चमचे जिरे, 3 चमचे धने आणि 2 चमचे बडीशेप घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिक्स करा. हे गॅसवर वीस मिनिटे उकळूद्या आणि गरमा-गरम प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

हे पेय आपण दररोज सकाळीच घेतले पाहिजे. जर हे खास पेय आपण दररोज घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. जिरेमध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. जिरे केवळ व्हिटॅमिन ई भरलेले नाही तर त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात.

बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Cumin, coriander and saunf are beneficial for weight loss)

Follow Us
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा