AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उपवर्गीकरणा विरोधात एल्गार, आंदोलकांच्या मागण्या काय?

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरसह बीड व लातूरमध्ये मोठे मोर्चे काढण्यात आले. उपवर्गीकरण रद्द करणे, बदर समिती अहवाल फेटाळणे, रिक्त पदे भरणे आणि डी-रिझर्वेशन थांबवणे या प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरवादी अनुयायी रस्त्यावर उतरले. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून, आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी जोर धरत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उपवर्गीकरणा विरोधात एल्गार, आंदोलकांच्या मागण्या काय?
SC Sub categorizationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 6:54 PM
Share

अनुसूचित जातीच्या प्रस्तावित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपवर्गीकरण रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली होती.

अनुसूचित जातीच्या प्रस्तावित उपवर्गीकरण्याच्या विरोधातील या मोर्चात रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप, राजकुमार बडोले, माजी आमदार बाबुराव माने आदी नेते उपस्थित होते. मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी 600 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता.

मोर्चातील प्रमुख मागण्या

आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा.

बदर समिती बरखास्त करून तिचा अहवाल फेटाळावा

रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत.

अनुसूचित जातीच्या अनुशेषासाठी विशेष भरती मोहीम राबवावी.

डी-रिझर्वेशन प्रक्रिया तात्काळ थांबवावी.

रोस्टर प्रणाली अधिक पारदर्शक करावी.

खुल्या प्रवर्गातून झालेल्या नोकरभरतीची श्वेतपत्रिका काढावी.

बीडमध्ये मोर्चा

दरम्यान, काल बीडच्या अंबाजोगाईत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि बीआरएसपीचे संस्थापक सुरेश माने या मोर्चात सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली होती. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा भाषणाने समारोप झाला. हातात निळे झेंडे आणि फलक घेऊन हजारो लोक मोर्चात सामील झाले होते. या मोर्चाला अनेक संघटनेचे नेते उपस्थित होते.

लातूर ढवळून निघालं

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथेही काल आरक्षणाच्या उपवर्गीकरणा विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, अनुसूचित जातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लावू नये, यासाठी हा अहमदपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. नगर परिषदेपासून सुरुवात झालेला हा मोर्चा अहमदपूर शहरातल्या मुख्य रस्त्यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत पोहनचला. त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा होऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...