AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar PartyMeeting : पवारांच्या खासदारांची दिल्लीत बैठक, नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार हेदेखील उपस्थित होते. बैठकीचे नेमके कारण समजू शकलेले नव्हते.

Sharad Pawar PartyMeeting : पवारांच्या खासदारांची दिल्लीत बैठक, नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
SHARAD PAWAR MEETINGImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 7:05 PM
Share

Sharad Pawar Meeting : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होऊ शकतो, असा दावा केला जातोय. हा दावा पवार गटाच्या बड्या नेत्यांनी फेटाळलेला आहे. परंतु पडद्यामागे घडलेल्या काही घडामोडींमुळे या शक्यतेबाबत अधूनमधून चर्चेला उधाण येत आहे. दरम्यान, आता दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

दिल्लीत बैठक, कोण कोण उपस्थित

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार हेदेखील उपस्थित होते. बैठकीचे नेमके कारण समजू शकलेले नव्हते. परंतु बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी बैठक का झाली, त्याचे कारण काय होते? याबाबत माहिती दिली. या बैठकीस शरद पवार यांच्यासह खासदार अमोल कोल्हे तसेच इतर खासदार हजर होते.

याआधी खासदार आणि मोदी यांच्यात बैठक

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली होती. ही बैठक तेव्हा चांगलाच चर्चेचा मुद्दा ठरली. विशेष म्हणजे मोदी आणि राष्ट्रवादींच्या खासदारांची भेट झाल्यानंतर आता याच खासदारांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यामुळे आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे.

बैठकीचं कारण काय? कोणत्या विषयांवर चर्चा?

दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. मतदारसंघांच्या विकासाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत अन्य कोणताही विषय नव्हता, असे कोल्हे यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत