जगातील सर्वात झणझणीत मिरची कोणती? हात लावतानाही कराल विचार

जगभरातील लोकांना मिरची खूप आवडते. तसेच आपल्याकडे तयार होणाऱ्या जवळपास प्रत्येक भाजीमध्ये मिरचीचा वापर केला जातो. मिरचीमध्ये आढळणाऱ्या अल्कलॉइड केमिकल कॅप्सॅसिनमुळे मिरचीतील मसालेदारपणा येतो. चला तर मग आम्ही तुम्हाला जगातील सर्वात तिखट मिरचीबद्दल सांगतो.

जगातील सर्वात झणझणीत मिरची कोणती? हात लावतानाही कराल विचार
जगातील सर्वात झणझणीत मिरची कोणती
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 6:35 PM

World’s Most Spicy Chili Peppers : आपल्या भारतात मसालेदार पदार्थ प्रत्येकजण आवडीने खात असतात. तर काही लोकं रोजच्या आहारात मिरचीचे लोणचं, मिरचीचा ठेचा तसेच वेगवेगळ्या पद्धतीने मिरचीचे सेवन करत असतात. तर काहींना मिरचीशिवाय अन्न अपूर्ण वाटते. त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मसालेदार पदार्थांची खूप आवड असते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खरे तर मिरचीची तिखट किंवा मसालेदार चव त्यात असलेल्या कॅप्सॅसिन नावाच्या रसायनामुळे असते.

मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी एक स्केल आहे, ज्याला स्कोव्हिल हीट युनिट्स (एसएचयू) म्हणतात. मिरची किती तीक्ष्ण आहे हे जाणून घेण्यासाठी स्कोव्हिल युनिटचा वापर केला जातो. म्हणजेच, मिरचीची स्कोव्हिल युनिट्स जितकी जास्त तितकी तिखट जास्त मसालेदार असेल. एक साधारण मिरचीमध्ये 5 हजार स्कोव्हिल युनिट्स असतात. मिरचीबद्दल जर तुम्ही इतके काही वाचलं असेल तर आता तुम्हाला जगातील सर्वात तिखट मिरचीबद्दल सांगणार आहोत.

कॅरोलिना रीपर मिरची

ही मिरची जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते. ही मिरची इतकी तिखट आहे की इस्ना नावाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही मिरचा सर्वात प्रथम दक्षिण कॅरोलिनामध्ये आढळली होती, म्हणून या मिरचीचे नाव कॅरोलिना रीपर आहे. या मिरचीची चव अतिशय तिखट असून तिचे परिणाम लगेच दिसून येतात. कॅरोलिना रीपर ही मिरची खाल्ल्यानंतर शरीरात तीव्र जळजळ, घाम येणे आणि डोळ्यात अश्रू येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी घटक देखील ठरू शकते.

त्रिनिदाद स्कॉर्पियन मिरची

ही मिरची तिच्या खास दिसण्यासाठी आणि मसालेदारपणासाठी प्रसिद्ध आहे. या मिरचीचा पोत वरच्या बाजूस टोकदार असून आकार स्कॉर्पीन पंजासारखा दिसतो. ही मिरची मूळची त्रिनिदाद आणि टोबॅगोचे आहे. याच कारणास्तव या मिरचीला त्रिनिदाद स्कॉर्पियन असे नाव देण्यात आले, ही मिरची कॅरोलिना रीपरनंतर दुसरी सर्वात तिखट मिरची मानली जाते.

7 पॉइंट हॉल मिरची

त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये आढळणारी ही मिरची गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाची असते. या मिरचीला ‘7 बिंदू’ म्हणून देखील ओळखले जाते, कारण ही मिरची एकाच वेळी सात भिन्न उष्णता निर्माण करणारे बिंदू तयार करते. ही मिरची सुद्धा खूप तिखट आणि मसालेदारपणासाठी प्रसिद्ध आहे.

भूत जोलाकिया मिरची

जगातील चौथ्या क्रमांकाच्या उष्ण मिरचीमध्ये इंडिया घोस्ट मिरची म्हणजेच भूत जोलाकिया मिरचीचे नाव घेतले जाते. भारतातील सर्वात उष्ण मिरची, मसाल्यांसोबत औषध म्हणून देखील वापरली जाते. ही मिरची खूप मसालेदार असून प्रामुख्याने भारतात आढळते. 2007 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही सर्वात तिखट मिरची मानली जात होती, परंतु नंतर त्यात या मिरची पेक्षा आणखी तिखट मिरची आसाम आणि नागालँडमध्ये आढळली.