AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारातील कंडिशनर केसांसाठी चांगले की, घातक वाचा!

केस गळती रोखण्यासाठी आणि चांगल्या केसांसाठी जवळपास सर्वजण केसांना कंडिशनर लावतात.

बाजारातील कंडिशनर केसांसाठी चांगले की, घातक वाचा!
केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे आपल्या केसांना आश्चर्यकारक फायदे देतात. मधात अँटी-ऑक्सीडंट्स भरपूर असतात. जे केस चमकदार करतात. उन्हाळ्यात केळी आणि मधाचा पॅक तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केस कोरडी होत नाहीत.
| Updated on: Apr 06, 2021 | 2:58 PM
Share

मुंबई : केस गळती रोखण्यासाठी आणि चांगल्या केसांसाठी जवळपास सर्वजण केसांना कंडिशनर लावतात. बाजारात मिळणाऱ्या या महागड्या कंडिशनर्सचा प्रभाव केवळ काही काळ केसांवर राहतो. कंडिशनरमुळे केसांची वाढ सुधारते आणि ते मजबूत व चमकदार बनतात असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, खरोखरच कंडिशनर लावणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे का? हे आपण बघणार आहोत. (Know About Applying conditioner to hair is beneficial or harmful)

-आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसे, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत, जे आपल्या केसांना ठराविक काळासाठी चमकदार बनवू शकतात. परंतु, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता.

-आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात.  ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात. यामुळे बाजारातून आणलेले कंडिशनर केसांना लावणे शक्यतो टाळाच. मात्र, आपण घरी देखील कंडिशनर तयार करू शकतात.

-कोरफड देखील केसांसाठी खूप प्रभावी मानला जातो. त्याचे कंडिशनर तयार करण्यासाठी प्रथम चाकूच्या मदतीने कोरफडच्या पानांमधून गर बाहेर काढा. त्यानंतर, त्यात एक लिंबू पिळून दोन्ही घटक चांगले मिसळा आणि केसांना लावा. हे मिश्रण सुमारे अर्धा तास केसांवर लावा आणि नंतर केस धुवा.

-केळीचा वापर केसांच्या कंडिशनिंगसाठीही केला जातो. यासाठी एक केळी, दोन चमचे खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल, एक चमचा मध, अर्धा लिंबू, दोन चमचे दही एकत्र मिसळा आणि मिक्सरच्या मदतीने बारीक पेस्ट बनवा. एका तासासाठी ही पेस्ट केसांना लावा आणि नंतर मग केस धुवा.

-दह्यामध्ये अंडी मिसळून हे मिश्रण देखील केसांना लावता येते. हे एक उत्तम कंडीशनर मानले जाते. हा पॅक सुमारे अर्धा तास केसांवर अप्लाय करा आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Know About Applying conditioner to hair is beneficial or harmful)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.