Kaal Bhairav | कोण आहेत काळ भैरव? ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने, जाणून घ्या…

भारत, श्रीलंका, नेपाळ, तिबेट इत्यादींसह जगातील बहुतांश ठिकाणी ‘बाबा काळ भैरव’ यांची पूजा केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांची उपासना केली जाते.

Kaal Bhairav | कोण आहेत काळ भैरव? ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने, जाणून घ्या...
काळ भैरव

मुंबई : भारत, श्रीलंका, नेपाळ, तिबेट इत्यादींसह जगातील बहुतांश ठिकाणी ‘बाबा काळ भैरव’ यांची पूजा केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांची उपासना केली जाते. महाराष्ट्रात खंडोबा या नावाने भैरवाची पूजा केली जाते, तर दक्षिण भारतात भैरव यांना शास्त असे नाव दिले गेले आहे. परंतु, सर्वत्र एक गोष्ट समान आहे की, त्यांना केवळ काळाचे स्वामी आणि कडक उपासनेचा देव म्हणून ओळखले जाते (Know About who is Kaal Bhairav).

असे मानले जाते की, भगवान शिवाकडे भूत, प्रेत, पिशाच, पूतना, कोत्रा ​​आणि रेवती इत्यादी सर्व गण आहेत. आपत्ती, रोग आणि मृत्यूचे सर्व दूत आणि देवता हे त्यांचे सैनिक आहेत आणि ‘बाबा काळ भैरव’ या सर्व गणांचे प्रमुख आहेत. असे म्हणतात की, विश्वनाथ काशीचे राजा आणि काल भैरव या नगरचा कोतवाल आहे.

काळ भैरवाची कहाणी

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे. तेव्हा, ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला. यामुळे, रागाने शिवाने रुद्र रूप धारण केले आणि काल भैरव त्यांच्या याच रूपात जन्मला. काळ भैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले. यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्म हत्येचा आरोप झाला.

ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने काल भैरव यांना प्रायश्चित्त करण्यास सांगितले. काळ भैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले. पण, काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. तेव्हापासून काशीमध्ये काळ भैरवची स्थापना झाली आणि शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले.

काळ भैरव पापींना शिक्षा करतो!

‘भैरव’ या शब्दाचा अर्थ आहे भयानक. भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा. त्यांना शिवाचे रूप मानले जाते. भैरवाला ‘दंड पाणी’ असे म्हणतात. ‘दंड पाणी’ अर्थात जे पापींना शिक्षा करतात. म्हणूनच त्याचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे. त्याला ‘स्वासवा’ असेही म्हणतात, स्वासवा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे (Know About who is Kaal Bhairav).

भैरव यांचीही ‘या’ नावांनी पूजा केली जाते.

तंत्रसरामध्ये भैरवाची आठ नावे नमूद केली आहेत. ‘भैरव’, ‘असितांग’, ‘रुरू’, ‘चंद’, ‘क्रोध’, ‘उन्मत’, ‘कपाली’, ‘संहार’. सनातन धर्माच्या तीन त्रिमूर्तीप्रमाणे भैरव, काळभैरव आणि बटुक भैरव अशीही तीन लोकप्रिय नावे आहेत. भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले, तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्ती दायक आणि सुखद असते.

‘काळ भैरवा’ची पूजा केल्यास ‘या’ समस्या दूर होतील!

– काल भैरवची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात. सर्वात मोठे शत्रू शांत होतात.

– काल भैरवची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ‘ॐ काल भैरवाय नमः’

–  जर तुम्ही कर्जात बुडाला असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळत नसेल, तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा.

– काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात, जर हा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल, किंवा झोप लागत नसेल, तर पुरोहितजींकडून भैरवाच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा. यामुळे मानसिक शांती मिळते.

– जर अचानक संकट सुरु झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघू लागला, तर शनिवारी ‘ ॐ भैरवाय नमः’ चा जप करावा आणि भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण करा. हळूहळू संकटे दूर होतील.

(टीप : सदर माहिती ज्योतिष तज्ज्ञ प्रज्ञा वशिष्ठ यांच्या माहितीवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा ‘टीव्ही 9 मराठी’चा उद्देश नाही.)

(Know About who is Kaal Bhairav)

हेही वाचा :

Magh Purnima 2021 | माघ पौर्णिमेचे पवित्र व्रत, जाणून घ्या व्रत विधी आणि शुभ मुहूर्त…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI