Korean Series फॅनसाठी खास कोरियन राईस फेस पॅक! मिळवून देईल त्यांच्यासारखी त्वचा, बनवा अशा पद्धतीनं!

आज आम्ही तुमच्यासाठी एक राईस फेसपॅक घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या त्वचेची घाण पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. हे आपल्याला निर्दोष, चमकदार आणि तरुण त्वचा मिळविण्यात मदत करते, तर चला जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी तांदळाचा फेस पॅक कसा बनवावा.

Korean Series फॅनसाठी खास कोरियन राईस फेस पॅक! मिळवून देईल त्यांच्यासारखी त्वचा, बनवा अशा पद्धतीनं!
Korean Actress
| Updated on: May 11, 2023 | 4:46 PM

मुंबई: निर्दोष आणि चमकदार त्वचा ही बनण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी तुम्ही तुमची त्वचा टिकवण्यासाठी अनेक महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्स, पार्लर किंवा ट्रीटमेंट्सचा आधार घेता. परंतु ते महाग तसेच रसायनांनी समृद्ध आहेत. या गोष्टी आपल्याला इच्छित परिणाम देत नाहीत. आज आम्ही तुमच्यासाठी एक राईस फेसपॅक घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या त्वचेची घाण पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. हे आपल्याला निर्दोष, चमकदार आणि तरुण त्वचा मिळविण्यात मदत करते, तर चला जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी तांदळाचा फेस पॅक कसा बनवावा.

राईस फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ताजा एलोवेरा जेल
  • तांदळाचं पीठ

राईस फेस पॅक कसा बनवावा?

  • राईस फेस पॅक बनवण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
  • मग त्यात तांदळाचे पीठ घालावे.
  • यानंतर कोरफडीच्या पानावरून ताजे जेल काढून त्यात घालावे.
  • मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा.
  • आता तुमचा कोरियन ग्लो राइस फेस पॅक तयार आहे.

राईस फेस पॅक कसा वापरावा?

  • राइस फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
  • त्यानंतर तयार केलेला पॅक ब्रशच्या साहाय्याने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगला लावा.
  • यानंतर चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे वाळवा.
  • त्यानंतर पाणी आणि कापसाच्या साहाय्याने चेहरा स्वच्छ करा.
  • यानंतर तुम्हाला हवं असेल तर बर्फाच्या साहाय्याने तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता.
  • चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही हा पॅक 2-3 वेळा ट्राय करू शकता.
  • याचा सतत वापर केल्याने तुमचा चेहरा चमकदार होतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)