Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र  ‘या’ चुका करणे टाळा!

महाशिवरात्री हा महादेव आणि माता पार्वतीच्या विशेष पूजेचा दिवस असतो. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते.

Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र  ‘या’ चुका करणे टाळा!
महाशिवरात्री

मुंबई : महाशिवरात्री हा महादेव आणि माता पार्वतीच्या विशेष पूजेचा दिवस असतो. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. यावेळी महाशिवरात्री उद्या म्हणजे 11 मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते (Mahashivratri 2021 mahadev pooja vidhi and does and donts during vrat).

अशा वेळी जर या दिवशी विधिवत पूजा केली गेली तर, महादेव खूप आनंदी होतात आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. जर, तुम्हीही या दिवशी महादेव-पार्वतीसाठी उपवास ठेवला असेल, तर त्यांच्या पूजेच्या वेळी इथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून, महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतील.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा :

– महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करावी. शास्त्रातसुद्धा शिवलिंगाची उपासना सर्वोत्तम मानली गेली आहे.

– प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा केली गेली, तर ती चांगली मानली जाते. असे मानले जाते की, प्रदोष काळात भगवान शिव स्वत: शिवलिंगात वास राहतात. सूर्यास्ताच्या एक तासापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सुमारे एक तास हा प्रदोष काळ मानला जातो.

– पूजेच्या वेळी महादेवाला पांढरी फुले अर्पण करा. महादेवाला आक फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शक्य असल्यास पूजेच्या वेळी स्वत: लाल किंवा पांढर्‍या रंगाचे कपडे घाला.

– बेलपत्र आणि धोत्रा अर्पण केल्याने देखील महादेव खूप आनंदी होतात. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्यावर चंदनाने ‘ऊँ नमः शिवाय’ अवश्य लिहा. याचबरोबर त्यांना अक्षत देखील अर्पण करा (Mahashivratri 2021 mahadev pooja vidhi and does and donts during vrat).

– महादेव पूजा करण्यापूर्वी, नंदी उपासना करा आणि शक्य असल्यास, या दिवशी एखाद्या बैलाल हिरव्या चारा खाऊ घाला.

– महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून आजच्या रात्री मणका ताठ ठेवून, बसून महादेवाचे ध्यान केले पाहिजे.

चुकूनही करू नका ‘या’ चुका!

– शिवलिंगाला अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टी सेवन करू नका.

– महादेवाचा जलाभिषेक कमळ किंवा कोणत्याही कलशामधून करा. जालाभिषेकासाठी चुकूनही शंख वापरू नका.

– महादेवाचा उपासनेत तुळस, चाफा किंवा केतकीची फुले वापरू नका.

– या दिवशी कोणाचीही फसवणूक करू नका. तसेच, कोणाचाही अपमान करू नका.

– महादेवाच्या पूजेच्या वेळी काळे कपडे घालू नका.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Mahashivratri 2021 mahadev pooja vidhi and does and donts during vrat)

हेही वाचा :

Mahashivaratri 2021 | नक्षत्रांच्या पंचकादरम्यान साजरी होणार यंदाची महाशिवरात्री, जाणून घ्या काय आहे ‘हा’ मुहूर्त!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI