
आजकाल प्रत्येकाला त्वचेच्या समस्या सतावत असतात. त्वचा निरोगी राहावी यासाठी अनेकजण आता घरगूती उपायांचा अवलंब करतात. कारण बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टसमध्ये केमिकल असते ज्याने त्वचेचे कालांतराने नुकसान होते. अशातच आईस क्यूब मसाज, किंवा आईस डिप हे त्वचेची काळजी घेण्याची एक सोपी पद्धत आहे जी त्वचेची छिद्रे घट्ट करण्यास आणि रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचे पोर्स घट्ट होतात आणि फ्रेशपणा टिकून राहतो. त्वचेवर जेप्व्हा आईस क्यूब मसाज करता तेव्हा त्वचा फ्रेश राहते. त्याचबरोबर त्वचेची सूज कमी करण्यास मदत करते. अमेरिकन अकादमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या मते कोल्ड कॉम्प्रेस अतिरिक्त फॅट, सैल त्वचा आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते, विशेषतः डोळ्यांखाली येणारी काळी वर्तृळे. तर आजच्या लेखात आपण काही नैसर्गिक घटकांसह बनवलेले हे आईस क्युब्स त्वचा चमकदार होण्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकता.
स्नायूंच्या ऊतींचे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाने शेकले जाते. कारण बर्फाने शेकल्याने जखमा बऱ्या होण्यास व लवकर भरून निघावे यासाठी ही थेरेपी प्रभावी आहे. अशा प्रकारे आईस क्युब्सनी चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्याने तुमच्या त्वचेला फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात नैसर्गिक घटकांसह बनवलेले हे आईस क्युब्स कसे तयार करायचे? त्यातच त्वचेच्या समस्या जसे की डाग कमी करण्यास देखील हे आईस क्युब्स कसे मदत करू शकतात.
कोरफड जेलचे आईस क्युब्स
पाण्याऐवजी तुम्ही कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस मिक्स करून आईस क्युब्स तयार करू शकता. या कोरफड जेलचे आईस क्युब्सने तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल आणि त्वचवर असलेले डाग कमी होतील. पुरळ आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास देखील हे उपयुक्त आहे.
आवळ्याच्या रसाचे आईस क्युब्स
व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेला आवळा त्वचा आणि केस दोघांसाठीही वरदान मानले जातात. आवळा खाणे केवळ फायदेशीर नाही तर त्वचेवर लावणे देखील फायदेशीर आहे. आवळ्याच्या रस तयार करून त्याचे आईस क्युब्स तयार करा त्यानंतर यांचे आईस क्युब्स त्वचेवर हलक्या हाताने मसाज केल्याने तुमची त्वचा चकमदार होईलच शिवाय त्वचा स्वच्छ होते. तारुण्य टिकवून ठेवण्यास मदत देखील होते.
ग्रीन टी आणि तांदळाचे पाण्याचे आईस क्युब्स
त्वचेच्या काळजीसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर खूप ट्रेंडी आहे आणि अनेक उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जात आहे. ग्रीन टी देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. चेहऱ्याच्या मसाजसाठी तुम्ही हे दोन घटक मिक्स करून बर्फाचे तुकडे बनवू शकता. तर हे आईस क्युब्स त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे तेलकट त्वचा आणि केसांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
कडुलिंबाच्या रसाचे आईस क्युब्स
अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले कडुलिंब त्वचेवरील पुरळ, मुरुमे आणि संसर्ग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी कडुलिंबाची पाने उकळून घ्या आणि गाळा. त्यानंतर त्याचे बर्फाचे तुकडे बनवा. या आईस क्युब्सने त्वचेवर मसाज करणे स्किनसाठी फायदेशीर आहे. तसेच तुम्ही या मिश्रणात टी ट्री ऑईल देखील मिक्स करू शकता. कडुलिंबाची पाने आणि सालीपासून बनवलेला फेस पॅक देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे.
बीट आणि गुलाब पाणी
तुम्ही बीटाचा रस आणि गुलाबपाणी यांचे बर्फाचे तुकडे बनवू शकता, जे तुमच्या त्वचेला गुलाबी चमक देण्यासोबतच फ्रेश ठेवेल. या आईस क्युब्सने चेहऱ्यावर मसाज केल्याने पिगमेंटेशन आणि त्वचेवरील बारीक रेषा कमी करण्यास देखील मदत होते. गुलाबपाणी हे एक उत्कृष्ट नैसर्गिक टोनर आहे, तर बीट अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)