पावसातील किटकांना असे दूर पळवा, घरातच तयार करा हा झटपट स्प्रे
Rainy Insects Home Remedies: पावसाळा सुरु होतात किटकांचाही प्रार्दुभाव वाढतो. डासांसोबत पावसाचे इतर किडे,उडणारे पाखरं दिव्यांभोवती घोंघावत रहातात. अशा Rainy Insects ना मारण्यासाठी घरच्या घरी स्प्रे कसा कसा तयार करायचा ते पाहा....

Home Hacks : पावसाळ्यात अनेक प्रकारचे किटक घरात यायला सुरुवात होते. त्यातील काही किडे सरपटणारे तर काही उडणारे असतात. हे किटक घरात अडगळीच्या जागी लपून बसतात. किंवा दिव्यांभोवत घोंघावत असतात. अशा किटकांना दूर पळवण्या स्प्रे घरच्या घरी तयार करता येतो. या हा होम मेड ( Homemade Spray ) स्प्रे कसा तयार करायचा आणि किटकांना त्याच्याद्वारे कसे पळवायचे याची सोपी पद्धत आपण पाहाणार आहोत. घरातील मुंग्यापासून माशा (Flies), झुरळ यांच्यावर हा स्प्रे फवारताच किटक नष्ट होण्यास मदत मिळणार आहे.
पावसाळ्यातील किटकांना दूर पळवून लावण्यासाठी सोप्या पद्धतीने स्प्रे घरातच तयार केला जाऊ शकतो. या स्प्रेला तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करावे, या पाण्यात लवंग टाकावी, जेव्हा पाण्याचा रंग बदलेल तेव्हा यात एक चमचा बेकींग सोडा (Baking Soda) टाकून मिक्स करावा. आता हे मिश्रण थंड करावे आणि स्प्रे असलेल्या बाटलीत भरावे. आता यात काही तेज पत्ते टाकावेत. मग तयार झाला तुमचा स्प्रे…हा स्प्रे किड्यांवर फवारल्याने किटक दूर पळून जातात. अनेक किटक मरतात देखील…
या टीप्स कामी येतील
किड्या मुंग्यांना पळवून लावण्यासाठी व्हाईट व्हीनेगरचा देखील वापर केला जातो. या व्हीनेगरच्या वासानेच किडे पळून जातात. व्हीनेगरच्या वासाने किडे दूर पळून जातात. व्हीनेगरला स्प्रेच्या बाटलीत भरुन किड्यांवर फवारा मारावा किंवा व्हीनेगरच्या पाण्याने पुसून घ्यावे त्यानंतर लादीवर किडे,माशा दिसणार नाहीत.
मीठाच्या ( Salt ) पाण्याने देखील लादी पुसली तर किटक दिसणार नाहीत. त्याने किटकांचा नाश होतो.
किड्यांना मारण्यासाठी लिंबूचा रस देखील वापरु शकता. लिंबूचा रस नुसता जरी किड्यांवर शिंपडला किंवा पाण्यात टाकून फवारा मारला तरी किड्यांचा मृत्यू होतो.
लसूण देखील किटकांना पळवून लावण्यासाठी मदतगार साबित होते. या लसणाच्या पाकळ्यांना चेचून पाण्यात टाकून त्याचाही स्प्रे तयार करु शकता. या एंटीबॅक्टीरियल आणि एंटी-फंगल मिश्रणाने किडे पळून जातात. माशा आणि मच्छरांना देखील पळवण्यासाठी ही आयडिया उपयोगी येते.
