AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Matcha ग्रीन टी म्हणजे काय? तुम्ही दररोज प्याल तर तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे

सोशल मीडियावर दररोज काही ना काही फूड ट्रेंड सुरूच असतो. या गोष्टी पाहून लोकं नवीन गोष्टी त्यांच्या डाएटमध्ये ट्राय करतात. आजकाल इंटरनेटवर मॅचा खूप ट्रेंड होत आहे. हा एक प्रकारचा ग्रीन टी आहे जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर या लेखात त्यांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

Matcha ग्रीन टी म्हणजे काय? तुम्ही दररोज प्याल तर तुम्हाला मिळतील 'हे' फायदे
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 4:02 PM
Share

आजकाल सोशल मिडियावर आपण पाहतोच अनेक फॅशन ट्रेंडस व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणेही खाण्यापिण्याचे ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. आपल्यापैकी बहुतेक लोकं असे आहेत जे व्हायरल होत असलेले डाएट ट्रेंड त्यांच्या आहारात समाविष्ट करतात. अशातच आता सोशल मिडियावर माचा ग्रीन टी लोकप्रिय होत आहे. जो हिरव्या रंगाचा दिसतो आणि चवीला थोडा गोड आणि कडू असतो. पण तुम्हाला माहित आहे का की हा ट्रेंड होत असलेला ग्रीन टी फक्त ट्रेंडी पेय नाही तर आरोग्याचा खजिना आहे. हा ग्रीन टी प्यायल्याने तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण माचा ग्रीन टीच्या आरोग्यदायी फायद्या बद्दल जाणून घेऊयात…

माचा हा एक प्रकारचा ग्रीन टी आहे ज्यामध्ये हिरवी पानांची पावडर बारीक केली जातात. सामान्य ग्रीन टीमध्ये आपण पाने पाण्यात उकळवतो, तर माचामध्ये पानांची संपूर्ण पावडर वापर करून ग्रीन टी प्यायली जाते. हेल्थलाइनच्या मते, माचा ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

माचा ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क, के, ई आणि बी कॉम्प्लेक्स, सेलेनियम, क्रोमियम, झिंक आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. ही ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्यात कॅफिनचे प्रमाण सामान्य ग्रीन टीपेक्षा जास्त असते.

हेल्थलाइनच्या मते, काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की हा माचा ग्रीन टी यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. 2015 च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की माचा ग्रीन टी प्यायल्याने यकृताच्या आजारांचा धोका कमी होतो. तर हेल्थलाइनच्या मते 2020 च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की माचा ग्रीन टी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग कमी करू शकते.

मॅचा ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅफिन आणि एलँटोइनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. त्यात क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते.

मॅचा ग्रीन टीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात ल्युटीन आणि कॅटेचिन नावाचे पोषक घटक असतात जे शरीर निरोगी ठेवतात. तसेच यांच्या सेवनाने आपल्या शरीरातील चयापचय वाढवते ज्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही ग्रीन टी सर्वोत्तम आहे.

माचा ग्रीन टी हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर रक्तदाब देखील नियंत्रित करते, म्हणून ज्यांचा रक्तदाब जास्त आहे त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम पेय आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?