Migraine | मायग्रेनमुळेही होऊ शकते मान दुखीची समस्या, ‘या’ लक्षणांना करू नका नजर अंदाज!

आपल्या पैकी अनेक लोकांना कधीना कधी डोकेदुखीची समस्या येतेच. परंतु, ही डोकेदुखी सामान्य आहे की, मायग्रेन आहे, हे ओळखणे सर्वात महत्वाचे आहे.

Migraine | मायग्रेनमुळेही होऊ शकते मान दुखीची समस्या, ‘या’ लक्षणांना करू नका नजर अंदाज!
मायग्रेन

मुंबई : आपल्या पैकी अनेक लोकांना कधीना कधी डोकेदुखीची समस्या येतेच. परंतु, ही डोकेदुखी सामान्य आहे की, मायग्रेन आहे, हे ओळखणे सर्वात महत्वाचे आहे. कारण मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्याचा उपचार वेळेवर न केल्यास ही समस्या आणखी गंभीर बनू शकते. सहसा, मायग्रेनमुळे डोकेच्या अर्ध्या भागामध्ये वेदना होते, तसेच त्याच वेळी उलट्या आणि मळमळ होण्याची संभावना देखील असते. परंतु, मायग्रेनची वेदना केवळ डोक्यापुरतीच मर्यादित नाही, तर उर्वरित शरीरापर्यंत देखील पोहोचू शकते (Migraine is not only about head ache it may cause neck ache also).

प्रकाश आणि आवाजामुळे होणारा त्रास

दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टर समीर मल्होत्रा यांनी मायग्रेनच्या वेदनांविषयी बोलताना सांगितले की, मायग्रेनच्या वेदनेत काही लोकांना फोनोफोबिया होतो, म्हणजेच मोठा आवाज ऐकल्यानंतर त्यांची चिडचिड होऊ लागते. हे आवाज रहदारीचे सामान्य आवाज, स्वयंपाकघरातून येणारे आवाज, दरवाजे उघडणे किंवा बंद करण्याचा आवाज असू शकतात. तर त्याच वेळी, काही मायग्रेनच्या रुग्णांमध्ये फोटोफोबिया असतो, म्हणजेच त्यांना प्रकाशाबद्दल संवेदनशीलता वाटते. तेजस्वी किंवा चमकदार प्रकाशामुळे डोळ्यांमध्ये अस्वस्थता येते.

चेहरा आणि जबड्यामध्ये देखील होतात वेदना

डॉ. समीर पुढे स्पष्ट करतात की, अनेकदा मायग्रेनमुळे, चेहऱ्यावर आणि जबड्यातही वेदना होऊ शकते. यामागचे कारण असे आहे की, मेंदूमधून चेहऱ्याकडे एक शिर येते, ज्याला ट्रायजेमिनल नर्व्ह म्हणतात. मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना जेव्हा या रक्तवाहिनीवर परिणाम करू लागतात, तेव्हा डोकेदुखीसह काही लोकांच्या चेहऱ्यावर आणि जबड्यातही वेदना होतात (Migraine is not only about head ache it may cause neck ache also).

मायग्रेनमुळे मान दुखी

मायग्रेनच्या रूग्णांची मानेही दुखू शकते. मायग्रेनचा झटका आलेल्या सुमारे 40 ते 42 टक्के रुग्णांना मान दुखीचीही समस्या उद्भवते. कधीकधी मानेतील वेदना देखील मायग्रेन दुखणे सुरू करणार असल्याचे लक्षण असू शकतात. मायग्रेन- फोटोफोबिया, मळमळ, डोकेदुखीच्या उर्वरित लक्षणांसह 80 टक्के प्रकरणांमध्ये मान दुखी सुरू होते. परंतु काही रूग्णांमध्ये, मायग्रेनची उर्वरित लक्षणे सुरू होण्याआधीच मान दुखी सुरू होते आणि उर्वरित लक्षणे बरे झाल्यानंतरही मान दुखी मात्र कायम राहते.

‘या’ गोष्टीही मायग्रेनला देऊ शकतात चालना

डॉ. समीरच्या म्हणण्यानुसार, कधीकधी अंडी, लिंबूवर्गीय फळे, चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य, दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोल यासारख्या गोष्टी खाणे, हवामानातील झालेले अचानक बदल किंवा जास्त ताणामुळेही मायग्रेन होऊ शकते. आपले मायग्रेन कशामुळे उद्भवत आहे, त्याचा ट्रिगर काय, हे शोधणे महत्वाचे आहे. जेणेकरून आपण त्या गोष्टी टाळून मायग्रेनच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.

(Migraine is not only about head ache it may cause neck ache also)

हेही वाचा :

Alert! शरीरात होणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, भयंकर होतील परिणाम

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI