Alert! शरीरात होणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, भयंकर होतील परिणाम

आताच्या जगण्यात ताणतणाव खूप वाढला आहे. त्यामुळे आपण फार काही आजाराकडे लक्ष देत नाही. पण असं करू नका. जर तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:10 PM, 25 Feb 2021
Alert! शरीरात होणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, भयंकर होतील परिणाम

मुंबई : अनेक वेळा शरीरात होणार्‍या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करतो. साधी डोकेदुखी आहे म्हणून सहज आपण पेन किलर खाऊन मोकळे होते. पण याकडे दुर्लक्ष करण्याची अनेक कारणं असू शकतात. हे दुर्लक्ष काही मोठ्या आजाराचं कारणदेखील असू शकतं. असाच एक रोग म्हणजे मायग्रेन (Migraine) आहे. कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला त्रास देऊ शकतं. म्हणूनच, ही लक्षणं वेळेत ओळखणं आणि त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. (health news do not ignore migraine here is the symptoms of migraine)

मायग्रेनचा त्रास होणं म्हणजे आरोग्याला धोका आहे. यामुळे दमा, डिप्रेशन आणि हृदयरोगासह इतर बर्‍याच रोगांचा धोका आहे. तर मायग्रेनच्या लक्षणांबद्दल महत्त्वाचं म्हणजे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. खरंतर, आताच्या जगण्यात ताणतणाव खूप वाढला आहे. त्यामुळे आपण फार काही आजाराकडे लक्ष देत नाही. पण असं करू नका. जर तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.

मायग्रेनची लक्षणं

– माइग्रेनचं मुख्य लक्षण म्हणजे डोकेदुखी. एखाद्याला ही वेदना डोकेच्या एका बाजूला असू शकते तर कुणालाही संपूर्ण डोके असू शकते.

– हालचालीमुळे डोकेदुखी वाढू शकते.

– तीव्र प्रकाशात डोकेदुखी वाढते. आवाजही ऐकावासा वाटत नाही

– डोकेदुखीसह मानही दुखण्यास सुरुवात होते.

– काहींना मळमळ आणि डोकेदुखीसह उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

– वारंवार झोपावसं वाटणं.

– अशक्तपणा, चक्कर येणे आणि घाम येणे.

– कधी थंडी, कधी जास्त उष्णता जाणवते.

– दिसण्यासही यामुळे त्रास होतो.

घरगुती उपाय

काही घरगुती उपचारांनी मायग्रेन आणि मानेच्या वेदनेपासून सुटका मिळवू शकता. वेदना सुरु झाल्यानंतर तात्काळ कानाच्या वरच्या बाजूला लव्हेंडर ऑईल लावा. लव्हेंडर आईल 15 मिनिटे सूंघल्यासही आपल्याला आराम मिळतो. अॅक्यूप्रेशर, अॅक्यूपंक्चर, सुंठ घातलेला चहा, मसाज, योगा आणि स्ट्रेचिंग आदिमुळे मायग्रेन आणि मानेच्या वेदना दूर होतील.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?

जर तुम्हाला नियमित वेदना होत असतील तर दुर्लक्ष करु नका. डोक्याला मार लागला, बोलताना त्रास जाणवू लागला, अधुक दिसू लागले आणि मान आखडल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. (health news do not ignore migraine here is the symptoms of migraine)

(health news do not ignore migraine here is the symptoms of migraine)