AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस ओले असताना कधीही करू नका या चुका; नंतर पश्चाताप करण्याची येईल वेळ

ओल्या केसांची काळजी कशी घ्यायची हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. त्यासाठी काही खास टीप्स फॉलो केल्या तर या चुका टाळणे शक्य आहे त्यामुळे केसांची पोतही सुधारेल आणि केस गळतीपासूनही आराम मिळेल.

केस ओले असताना कधीही करू नका या चुका; नंतर पश्चाताप करण्याची येईल वेळ
hairs careImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2025 | 4:52 PM
Share

ओल्या केसांची काळजी कशी घेतली पाहिजे बऱ्याचजणांना कल्पना नसते त्यामुळे काही चुका खूप धोकादायक ठरू शकतात. केस ओले असताना, केसांचे क्लूटिकल खुले होतात आणि केसांची रचना कमकुवत असते. यावेळी, जोरदार ब्रशिंग करणे, कडक टॉवेलने केस चोळणे किंवा केसांचे टाय बांधणे यामुळे केस गळणे, तुटणे आणि बरेच नुकसान होऊ शकते. सर्वप्रथम, आंघोळीसाठी जाण्यापूर्वी नेहमीच तुमचे केसातील गुंता काढा. यामुळे गुंतागुंतीशिवाय तुमचे केस धुणे सोपे होते आणि तुमच्या केसांवर अनावश्यक ताण पडणार नाही. जर तुमचे केस खूप गुंता झालेले असतील तर ब्रशिंग करण्यापूर्वी थोडेसे सीरम किंवा तेल लावणे फायदेशीर ठरते.

शॅम्पू किंवा कंडिशनिंग केल्यावर या चुका टाळा 

शॅम्पू किंवा कंडिशनिंग केल्यानंतर, ओल्या केसांना एका खास पद्धतीने हाताळले पाहिजे. बरेचदा लोक ओले केस जोरात कंगवा करतात, ज्यामुळे केसांची रचना खराब होते. त्याऐवजी, लीव्ह-इन कंडिशनर लावा मग कंगवा करा. शक्य असल्यास, रुंद दात असलेला कंगवा किंवा डिटॅंगलिंग ब्रश वापरा, ज्यामुळे केस तुटत नाही.यामुळे केसांचे नुकसान होणार नाही.

ओले केस पोनीटेल किंवा बनमध्ये लगेच बांधू नका

ओले केस कधीही पोनीटेल किंवा बनमध्ये लगेच बांधू नका. केस ओले असताना त्यांची लवचिकता जास्त असते आणि ओढल्यावर ते तुटू शकतात. पोनीटेलमध्ये बांधल्यावर, सुकताना ते घट्ट होते, ज्यामुळे केसात गाठी तयार होतात आणि त्यातील केस तुटू शकतात. लक्षात ठेवा, ओल्या केसांसाठी क्लिप किंवा सैल वेण्या हा सर्वोत्तम पर्याय आहे, जेणेकरून केस कमी तुटले जातात.आणि नीट सुकतात.

ब्लो-ड्रायर वापरताना काळजी घ्या.

ब्लो-ड्रायर वापरताना काळजी घ्या. बरेच लोक ओल्या केसांवर थेट ब्लो-ड्रायर वापरतात, ज्यामुळे केसांच्या शाफ्टमधील ओलावा निघून जातो आणि क्यूटिकल्स तुटतात. त्याऐवजी, ओले असताना मायक्रोफायबर टॉवेलने केस वाळवा, नंतर मध्यम आचेवर ब्लो-ड्रायर वापरा. ​​यामुळे तुमच्या केसांचे नैसर्गिक प्रोफाइल टिकून राहील आणि ते घट्ट राहतील.

रात्री ओल्या केसांनी झोपणे ही एक मोठी चूक आहे.

रात्री ओल्या केसांनी झोपणे ही एक मोठी चूक आहे. त्यामुळे केस तुटतातच पण स्कॅल्पवर बॅक्टेरिया आणि बुरशीची फंगस देखील होऊ शकतात. परिणामी केस गळतात, स्कॅल्पवर इरिटेशन होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बेडशीटमध्ये तुटलेले केस दिसतात. जर तुम्ही रात्री केस धुण्याचा विचार करत असाल तर प्रथम मायक्रोफायबर टॉवेलने जास्तीचा ओलावा काढून टाका आणि नंतर मध्यम आचेवर हलक्या हाताने ड्राय करा.

Follow Us
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....