AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care | एनर्जी ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळण्याची सवय? आरोग्यासाठी ठरू शकते अतिशय घातक!

आजकाल, एनर्जी ड्रिंक्ससह कॅफिनेटेड पेयांमध्ये अल्कोहोल मिसळून पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. यामुळे पेयाला एक नवीन चव मिळण्यासह, आपण बर्‍याच काळ ऊर्जावान राहता.

Health Care | एनर्जी ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळण्याची सवय? आरोग्यासाठी ठरू शकते अतिशय घातक!
एनर्जी ड्रिंक आणि अल्कोहोल
| Updated on: Feb 16, 2021 | 12:09 PM
Share

मुंबई : आजकाल, एनर्जी ड्रिंक्ससह कॅफिनेटेड पेयांमध्ये अल्कोहोल मिसळून पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. यामुळे पेयाला एक नवीन चव मिळण्यासह, आपण बर्‍याच काळ ऊर्जावान राहता. आपल्याला हे प्रयोग करून एखादी छान चव चाखायला मिळेल, परंतु वेगवेगळे ड्रिंक्स एकत्र करून पिण्याची ही सवय आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते (Mixture of energy drink and alcohol is harmful for health).

दोन ड्रिंक्स एकत्र मिसळल्यावर काय होते?

अल्कोहोल आणि एनर्जी ड्रिंक ही दोन भिन्न प्रकारची ड्रिंक्स आहेत. एकाचे सेवन केल्याने आपण आपली शुद्धच हरपून बसता आणि दुसरे पेय आपल्याला दिवसभर ऊर्जावान ठेवते. जेव्हा आपण अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक मिसळून पिता, तेव्हा आपण बराच वेळ जागे राहता. हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.

विज्ञान काय म्हणते?

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जे लोक एनर्जी ड्रिंक्समध्ये मिसळलेले अल्कोहोल पीतात, ते नेहमीपेक्षा जास्त अल्कोहोल सेवन करतात. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार, जे लोक एनर्जी ड्रिंक घालून मद्यपान करत नाहीत, ते तीनपट कॉकटेल पितात. जास्त प्रमाणात अल्कोहोल घेणे शरीरासाठी विष म्हणून काम करते. मद्यपान केल्यावर उलट्या होणे, चक्कर येणे आणि श्वास लागणे अशा समस्या देखील येऊ शकतात (Mixture of energy drink and alcohol is harmful for health).

हृदयासाठी धोकादायक!

एनर्जी ड्रिंक्समध्ये मिसळलेले अल्कोहोल पिणे हृदयासाठी देखील धोकादायक ठरू शकते. कारण, दोन्ही पेय एकत्र रक्त पिण्यामुळे ब्लड प्रेशरवर गंभीर परिणाम होतो. 2018च्या अभ्यासानुसार, दोन ड्रिंक्स एकत्र पिण्यामुळे रक्तपेशींवर परिणाम होतो. हे आपल्या सिस्टोल आणि डायस्टोलवरचा दबाव वाढवते. रक्तदाबात अशा प्रकारचे बदल आपल्या हृदयावर मोठा दबाव आणतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्याने तुमच्या यकृताच्या कार्यावर आणि झोपेच्या पद्धतीवरही परिणाम होतो.

अल्कोहोलमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात, तर एनर्जी ड्रिंकमध्ये अधिक प्रमाणात साखर असते. म्हणून यांचे एकत्रित सेवन केल्याने वजन देखील वाढू शकते. तसेच दररोज अल्कोहोल आणि एनर्जी ड्रिंक पिण्याने मधुमेहासारखे आजार देखील उद्भवू शकतात. एनर्जी ड्रिंकची एक छोटी बाटली सेवन केल्याने शरीरात साखरेचे 30 ग्रॅम प्रमाण वाढू शकते, तर 50 मिली अल्कोहोल त्यात मिसळल्यास 126 कॅलरी शरीरात जातात, ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

एनर्जी ड्रिंक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण वजन कमी करू इच्छित असल्यास, आपल्या आहार यांना समाविष्ट करू शकता. परंतु, आपण या दोन्ही ड्रिंक्सचे मिश्रण कटाक्षाने टाळा, जेणेकरून आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही.

(Mixture of energy drink and alcohol is harmful for health)

हेही वाचा :

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.