AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त ‘या’ 5 अ‍ॅक्सेसरीज वापरा आणि वॉशिंग मशीनला द्या दीर्घायुष्य

महागडी वॉशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ती वर्षानुवर्षे चांगल्या स्थितीत राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. या ५ स्मार्ट अ‍ॅक्सेसरीजच्या मदतीने तुम्ही सहजपणे मशीनचे आयुष्य वाढवू शकता आणि कपडे नेहमीच एकदम स्वच्छ व चमकदार मिळवू शकता. खर्चही फारसा न करता ही काळजी घेणे सहज शक्य आहे.

फक्त 'या' 5 अ‍ॅक्सेसरीज वापरा आणि वॉशिंग मशीनला द्या दीर्घायुष्य
| Edited By: | Updated on: Jun 14, 2025 | 2:49 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वॉशिंग मशीन ही प्रत्येक घरातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे. कपडे धुण्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण सेमी ऑटोमॅटिकपासून फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनपर्यंत विविध पर्यायांचा वापर करतात. मात्र केवळ महागडी व चांगली वॉशिंग मशीन खरेदी केली म्हणजे काम संपत नाही, तर ती दीर्घकाळ टिकण्यासाठी योग्य देखभाल आणि काही स्मार्ट अ‍ॅक्सेसरीजचा वापर करणे तितकेच महत्त्वाचे असते.

मशीन दीर्घकाळ व्यवस्थित चालू राहावी, कपडे कायमस्वरूपी स्वच्छ आणि चमकदार राहावेत यासाठी काही खास उपकरणांचा वापर खूप फायदेशीर ठरतो. हे उपकरणे केवळ मशीनची परफॉर्मन्स वाढवत नाहीत, तर पाण्याचा आणि विजेचा अपव्ययही कमी करतात.

चला तर पाहूया अशी कोणती ५ स्मार्ट अ‍ॅक्सेसरीज आहेत, ज्या वॉशिंग मशीनच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवू शकतात:

1. मजबूत आणि अ‍ॅडजस्टेबल स्टँड

वॉशिंग मशीन खाली मजबूत स्टँड लावल्याने मशीन जमिनीच्या थेट संपर्कात राहत नाही. त्यामुळे धूळ, पाणी किंवा कीटकांपासून संरक्षण मिळते. यामुळे मशीनची गंजण्याची शक्यता कमी होते आणि चालू असताना निर्माण होणाऱ्या कंपनांपासूनही बचाव होतो. याचे उंची अ‍ॅडजस्ट करण्याचे फिचरही अनेकदा उपयुक्त ठरते.

2. वॉटर सॉफ्टनर

कठीण पाण्यामुळे कपड्यांची चमक कमी होते व मशीनमध्ये स्केल तयार होतो. वॉटर सॉफ्टनर वापरल्यास पाण्यातील हानिकारक घटक कमी होतात. यामुळे कपडे अधिक स्वच्छ आणि मऊ राहतात व मशीनचे अंतर्गत पार्ट्स सुरक्षित राहतात.

3. डीस्केलिंग पावडर

वॉशिंग मशीनमध्ये दीर्घकाळ वापरामुळे स्केल किंवा चिकट थर तयार होतो. हा थर मशीनच्या कार्यक्षमतेवर वायफळ भार टाकतो. डीस्केलिंग पावडरच्या नियमित वापराने मशीन आतून स्वच्छ राहते आणि तिची परफॉर्मन्स दीर्घकाळ टिकते.

4. वॉशिंग मशीन कव्हर

मशीन चालू नसताना तिच्यावर धूळ, पाणी किंवा कीटकांची घाण बसते. मशीन कव्हर वापरल्यास ही समस्या टाळता येते. पावसाळ्यात व दमट हवामानात हे कव्हर अतिशय उपयुक्त ठरते.

5. अँटी-वायब्रेशन पॅड

वॉशिंग मशीन चालू असताना ती हलते व आवाज करते. अँटी-वायब्रेशन पॅड लावल्यानंतर हे आवाज व हालचाल कमी होतात. यामुळे मशीन अधिक स्थिर राहते आणि परिसरात शांतता नांदते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.