मोहरी की आवळा? निरोगी आणि मजबूत केसांसाठी कोणते तेल आहे अधिक फायदेशीर?
लांब, दाट आणि काळे केस असावेत असे प्रत्येकालाच वाटत असतं. पण आजकालच्या खाण्या-पिण्याच्या व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे त्यांचा परिणाम कमी वयातच केसांवर होताना दिसत आहे.

लांब, दाट आणि काळे केस असावेत असे प्रत्येकालाच वाटत असतं. पण आजकालच्या खाण्या-पिण्याच्या व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे त्यांचा परिणाम कमी वयातच केसांवर होताना दिसतोय. केस गळणे, केसांची वाढ न होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी या समस्यापासुन सुटका मिळवण्यासाठी बहुतेकजण हेअर केअर करणारे प्रोडक्ट वापरत असतात. पण या हेअर केअर प्रोडक्टमध्ये कॅमिकल असल्याने त्यांचा दुष्परिणाम केसांवर होतो. आजकाल प्रत्येकजण निरोगी आणि मजबूत केसांसाठी घरगूती उपाय करत असतात. या उपायांचा केसांवर कोणताच दुष्परिणाम होत नाही. अशातच तुम्ही सुद्धा निरोगी आणि चमकदार केसांसाठी हेअर केअर मध्ये मोहरीचे तेल लावणे अधिक फायदेशीर ठरेल की आवळ्याचे तेल ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
केस मजबूत आणि निरोगी करण्यासाठी, बहुतेक लोक खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल आणि आवळा तेल वापरतात. तसेच हे तेल वेगवेगळ्या प्रकारे हेअर केअर करताना लावल्यास फायदेशीर ठरते. पण बहुतेकजण आवळा तेल लावणे फायद्याचे ठरते की मोहरीचे तेल या संभ्रमात असतात. तर मोहरीचे तेल आणि आवळ्याचे तेल हे दोन्ही तेल केसांसाठी फायदेशीर आहे.
मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड्ससारखे पोषक घटक आढळतात. मोहरीचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर असते. मोहरीचे तेल केसांना मजबूत आणि नैसर्गिकरित्या काळे करण्यास, केसांची वाढ करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करते.
तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक घटक असतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. आवळ्याचे तेल केसांना लावल्याने केस काळे आणि मजबूत होतात, केसांची वाढ होते आणि कोंडा कमी होतो.
मोहरी आणि आवळा हे दोन्ही तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. मोहरीचे तेल केसांना ओलावा देते, रक्ताभिसरण सुधारते आणि केस कोरडे होण्यापासून रोखते. तर आवळा तेल स्कॅल्पला थंड करण्यास, केसांच्या वाढीसाठी आणि त्यांना चमकदार बनविण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या तेलांचा वापर करू शकता.
हे दोन्ही तेल एकत्र करूनही वापरता येतात. 2 चमचे मोहरीचे तेल आणि 1 चमचा आवळा तेल मिक्स करून केसांना लावा. यामुळे केस गळणे कमी होण्यास, ते काळे होण्यास आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
