National Beverage Day – जगात सर्वाधिक कोणते 10 ड्रिंक्स प्यायले जातात, घ्या जाणून..

6 मे हा दिवस नॅशनल बेवरेजेज डे (National Beverage Day) म्हणजेच राष्ट्रीय पेय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या आवडत्या पेयाचा आनंद घेण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात जगभरात सर्वाधिक पसंतीची 10 पेय म्हणजेच ड्रिंक्स...

National Beverage Day - जगात सर्वाधिक कोणते 10 ड्रिंक्स प्यायले जातात, घ्या जाणून..
जगात सर्वाधिक कोणते 10 ड्रिंक्स प्यायले जातात, घ्या जाणून..
Image Credit source: TV9
दादासाहेब कारंडे

|

May 06, 2022 | 8:00 AM

मुंबईआपल्याला राजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या पेयाची (Drinks) सवय असते. म्हणजे कुणाला चहा (Tea) आवडतो, कुणाला कॉफी आवडते, तर कुणाला सरबत, तर कुणाला थंड गारेगार बिअर आवडते. आपण आपल्या वेळेनुसार आणि सवयीनुसार त्याचे सेवन करत असतो. त्याचा आनंद रोजच्या जीवनात घेत असतो. तुम्हाला कोणते ड्रिंक्स सर्वाधिक पसंत आहे. ड्रिंक्स म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका. पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडणाऱ्या पेयाचा आनंद पुरेपूर आनंद घेण्याचा दिवस.. मग ते चहा असो, कॉफी असो, नारळ पाणी असो वा बिअर असो. 6 मे हा दिवस नॅशनल बेवरेजेज डे (National Beverage Day) म्हणजेच राष्ट्रीय पेय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या आवडत्या पेयाचा आनंद घेण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात जगभरात सर्वाधिक पसंतीची 10 पेय म्हणजेच ड्रिंक्स…

हे सुद्धा वाचा

  1. चहा- हे संपूर्ण भारतातील लोकांचे अत्यंत जिव्हाळ्याचे पेय आहे. जवळपास देशातील प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. अनेकांना तर दिवसभरातून दोन ते तीन वेळा चहा घेण्याची सवय असते. काही जण तर चहाचे व्यसनी म्हणूनही ओळखले जातात. भारतासह आशिया खंडात या पेयाला विशेष महत्त्व आहे. आता तर निरनिराळ्या स्वरुपांचे, ब्रँडचे, चवींचे चहाही लोकप्रिय होताना दिसतायेत. इंग्लंडमध्येही वेगवेगळ्या चवींचे चहा पसंतीला उतरतात.
  2. कॉफी – ज्यांना चहा आवडत नाही अशा व्यक्ती कॉफी पिण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. भारतात दक्षिणेकडील राज्यांत कॉफीला विशेष मागणी आहे. तसेच स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणात कॉफी आवडते. जगभराचा विचार केला तर कॉफी पिणाऱ्यांची संख्या चहा पिणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. आश्चर्य वाटलं ना ऐकून..
  3. बिअर – उन्हाळ्यात उन्हाच्या प्रकोपात बिअर पिण्याची एक वेगळीच नशा आहे. जगभरात बिअरला विशेष मागणी आहे. जगभरात असेही अनेक जण आहेत ज्यांची दिवसाची सुरुवात बिअरच्या लिक्लविड ब्रेकफआस्टने होते. उन्हाळ्याच्या काळात थोडी कडवट चवीची बिअर अनेकांसाठी हवीहवीशी असते. अनेक पार्ट्यांमध्ये बिअरला विशेष मागणी असते. त्यातही आता गव्हाची बिअर (व्हीट बिअरची) क्रेझ दिवसेंदिवस वाढते आहे.
  4. सूप – चव आणि आरोग्यदायी यासाठी सूप आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. अनेकदा हॉटेलांत स्टार्टर म्हणूनही सूप अनेकांना प्रिय असते. विशेष करुन व्हेजिटेबल सूप, चिकन सूप हे आवडत्या पेयांमध्ये प्राधान्यक्रमावर आहे.
  5. एनर्जी ड्रिंक्स – सध्याच्या नव्या पिढीत याची मागणी आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. झोप येऊ नये, अभ्यासासाठीही एनर्जी ड्रिंक्स पिण्याची प्रथा वाढते आहे. यात कोल्डड्रिंक्स, पॅक फूड ड्रिंक्स, ग्लुकोज ड्रिंक्सचा आवडीच्या पेयांमध्ये समावेश आहे.
  6. व्होडका – रशियाचे पेय अशी ओळख असलेली व्होडका जगभरात लोकप्रिय आहे. विशेषता स्त्रियांमध्ये ही जास्त आवडीने प्यायली जाते. इथेनॉल आणि पाण्याच्या मिश्रणातून व्होडका तयार करण्यात येते. थंडीच्या दिवसांत व्होडका पिण्याची मजा काही औरच. पूर्व युरोप आणि अमेरिकेत व्होडका सर्वाधिक प्यायली जाते.
  7. वाईन – रेड आणि वाईन असे वाईनचे दोन प्रकार आहेत. हलकी नशा देणारे, थोडेसे गोडसर असलेले हे पेयही सध्या चांगलेच पसंतीला उतरते आहे. द्राक्षांपासून तयार होणाऱ्या वाईनचा प्रवास आता जांभळं आणि इतर फळांपर्यंतही पसरत चालला आहे. राज्यात नाशिक हे वायनरीचे मुख्य केंद्र मानले जाते. परदेशातही वाईनला विशेष महत्त्व आहे. नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक अशा दोन्ही प्रकारात वाईन उपलब्ध असते.
  8. कोकाकोला – जगभरातील पेयांची चर्चा होत असताना कोकाकोलाचे नाव निघणार नाही, असे घडणेच अशक्य. जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध पेयांत कोकाकोलाचाही समावेश आहे. त्यासोबत आता इतरही ब्रँड थम्स अप, पेप्सी, मिरिंडा, स्प्राईट यांचीही मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.
  9. दूध – दूधाला कम्प्लिट डायट मानण्यात येते. आरोग्यदायी आणि अनेक रोगांवर उपचार म्हणून दुधाकडे पाहिले जाते. दुधाला टॉप पेयांमध्ये स्थान मिळवून देण्यात लहान मुलांचा मोठा वाटा आहे. बरेच जण रात्री झोपण्यापूर्वी दूध पिवून झोपणे पसंत करतात.
  10. ऑरेंज ज्यूस – ऑरेंज ज्यूस याचाही समावेश जगभरातील टॉप १० ड्रिंक्समध्ये होतो. चव आणि आरोग्य या दोन्हीसाठी हे ज्यूस प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या काळात ऑरेंज ज्यूसचे सेवन सर्वाधिक करण्यात येते. त्यामुळे शरिरातील मीठाचे प्रमाणही योग्य राखता येते.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें