घरामध्ये या ठिकाणी कधीही ठेवू नका घड्याळ, टाकतात नकारात्मक प्रभाव
Vastu Tips : तुमच्या हातात असलेले घड्याळ किंवा घरात भींतीवर टांगलेले घड्याळ देखील आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. वास्तूशास्त्रात घड्याळाचा आकार, दिशा आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींवर देखील माहिती दिली गेली आहे. घड्याळ कोणत्या दिशेला ठेवू नये, भिंतीवर कोणते घड्याळ असावे जाणून घ्या.

Vastu Tips : वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी कुठे आणि कोणत्या दिशेला असाव्या याबाबत उपाय देण्यात आले आहेत. आपल्या घरातील अनेक गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. आता आज आप हातात घातले जाणारे घड्याळबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक लोक हातातले घड्याळ हे झोपताना उशीखाली ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार असे करु नये. घड्याळ जर उशीखाली ठेवून झोपले तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. घडाळ्यातून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा आपल्या मेंदू आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. या लहरींमुळे संपूर्ण खोलीत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे तुमची मनःशांती बिघडते आणि तणाव निर्माण होतो.
वास्तुशास्त्रानुसार प्रगती आणि आर्थिक यश याला देखील वास्तूशास्त्राशी जोडले गेले आहे. तुम्ही तुमच्या घरातील वास्तू दोषही घड्याळाच्या माध्यमातून दूर करू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ गोल, चौकोनी, अंडाकृती असावे. यामुळे सकारात्मकता वाढते. त्यामुळे घड्याळ खरेदी करताना घड्याळाच्या आकाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घराच्या भिंतीवर पेंडुलमचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते. भिंतीवर पेंडुलम घड्याळ लावल्याने वेळ चांगला राहतो आणि जीवनातील संकटे दूर होतात.
(अस्वीकरण – या लेखात दिलेली माहिती ही वास्तूशास्त्रात दिलेल्या सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही समस्या असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
