नव्या वर्षाच्या पार्टीसाठी हे बीच सर्वात भारी, कमी पैशात समुद्रकिनारी करा जोमात सेलिब्रेशन!

Happy New Year 2026 : पुढील काही दिवसांमध्ये आपण 2025 चा निरोप घेणार आहोत, 2026 च्या स्वागताची तयारीही सुरु झाली आहे. आज आम्ही तुम्हाला नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोणते समुद्रकिनारे खास आहेत याची माहिती सांगणार आहोत.

| Updated on: Dec 10, 2025 | 10:17 PM
1 / 5
बागा बीच, गोवा : बागा बीच हा उत्तर गोव्यातील पार्टी कॅपिटल म्हणून ओळखला जातो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येथे प्रचंड उत्साहाचे वातावरण असते. या किनाऱ्याजवळ असलेल्या टिटोज आणि कॅफे मॅम्बो सारख्या जगप्रसिद्ध नाईट क्लब्समध्ये भव्य पार्ट्या आयोजित केल्या जातात, तुम्ही त्यात सहभागी होऊ शकतात.

2 / 5
अंजुना बीच, गोवा : अंजुना हा गोव्यातील ट्रान्स म्युझिक आणि बोहेमियन संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. नवीन वर्षाला येथे अनेक प्रसिद्ध पार्टी ठिकाणे आहेत. कर्लीज आणि शिवा व्हॅली येथे फुल मून पार्टीज किंवा न्यू इयर ट्रान्स इव्हेंट्स आयोजित केले जातात.

3 / 5
वर्कला बीच, केरळ : वर्कला बीच हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील उंच कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे गोव्यासारखे मोठे नाईट क्लब्स नसले तरी, कड्यांवर असलेल्या रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये नवीन वर्षाच्या वेळी खास मेनू, लाईव्ह म्युझिक आणि उत्कृष्ट दृश्यांसह शांत पार्टीचे आयोजन केले जाते.

4 / 5
राधानगर बीच, अंदमान आणि निकोबार : हैवलॉक बेटावर असलेला राधानगर बीच आशियातील सर्वोत्तम बिचेसपैकी एक आहे. येथे गोव्यासारख्या व्यावसायिक पार्ट्या होत नाहीत, पण नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात नवीन वर्षाचे स्वागत करायचे असल्यास हे ठिकाण सर्वोत्तम आहे.

5 / 5
मोरजिम बीच, गोवा : मोरजिम बीच हा तुलनेने शांत आणि लक्झरी पार्टीसाठी ओळखला जातो. हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांसाठीही प्रसिद्ध आहे. नवीन वर्षाच्या वेळी येथील काही लक्झरी बीच क्लब्स आणि रिसॉर्ट्समध्ये हाय-प्रोफाईल, नीऑन-थीम असलेल्या खासगी पार्ट्यांचे आयोजन केले जाते.