तुम्ही खात असलेले चमचमीत नुडल्स आले कोठून? जाणून घ्या त्यांचा हा रंजक इतिहास

नूडल्स खाणे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि आज बाजारात वेगवेगळ्या चवींच्या इन्स्टंट नूडल्सची भर पडली आहे, पण नूडल्सची उत्पत्ती कधी आणि कुठून झाली हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

तुम्ही खात असलेले चमचमीत नुडल्स आले कोठून? जाणून घ्या त्यांचा हा रंजक इतिहास
Noodles
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 1:29 PM

नुडल्स म्हंटले की नुसतं नाव ऐकताच बहुतेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यात आजकाल नुडल्स हा प्रकार युवा पिढीचा एकदम खास खादयपदार्थ आहे. बघता बघता हा परदेशी पदार्थ पुरता आपल्याकडे व्यापून गेला आहे आणि हा पदार्थ आज आपल्याला गल्लोगल्लीत मिळू लागला आहे. त्यामुळे जगभरात नूडल्स खूप लोकप्रिय असा पदार्थ ठरलेला आहे आणि त्यांची नावे वेगवेगळ्या त्यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेनुसार बदलतात, जसे की पॅड थाई नूडल्स, हो फन (हे फ्लॅट नूडल्स आहेत), बिहोन, चाउमेन, लोमेन, सोमेन, उडोन, सोबा, रामेन. भारतातही मोठ्या रेस्टॉरंट्सपासून ते स्ट्रीट फूड स्टॉलपर्यंत अनेक प्रकारचे नूडल्स उपलब्ध आहेत. नूडल्स बनवण्याची पद्धत ही प्रत्येक देशांच्या पद्धतीनुसार बदलते आणि त्यांची चवही त्यानुसार बदलते. नूडल्स इतके लोकप्रिय आहेत, परंतु ते कसे आणि केव्हा बनवायला सुरुवात झाली हे क्वचितच कोणाला माहिती असेल.

भारतात नूडल्सहे जरी स्ट्रीट फूड म्हणून खाल्ले जाऊ शकते, परंतु अनेक देशांमध्ये नुडल्स हा तेथील लोकांचा जेवणाचा भाग आहे. परदेशी लोकांच्या आहारात मोठ्या प्रमाणात नुडल्सचे सेवन केले जाते. त्यातच आपल्या भारतातबहुतेकदा चाउमीन, हक्का नूडल्स, मॅगी आणि थुकपा लोकप्रिय आहेत. तुम्ही खूप नुडल्स प्रेमी आहात तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात नूडल्स बनवण्याची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा इतिहास काय आहे…

नूडल्सचा इतिहास जुना आहे

जर तुम्हाला नूडल्स खूप आवडत असतील तर हे जाणून घ्या की ही नुडल्स बनवणे हे नवीन नाहीयेत. कारण नूडल्सचा इतिहास खूप जुना आहे. काही पुरातत्वीय शोधांनुसार, असे म्हटले जाते की नूडल्स बनवण्याची सुरुवात 4000 वर्षांपूर्वी झाली. त्या वेळी, नूडल्स बाजरीपासून बनवले जात असत आणि कालांतराने ते विकसित झाले. ते गहू आणि तांदूळ इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांपासून बनवले जाऊ लागले.

नूडल्सचा उगम कुठून झाला?

असे मानले जाते की नूडल्सची उत्पत्ती चीनमध्ये झाली. कारण नुडल्स बनवण्याचे सर्वात जुने पुरावे चीन मध्ये सापडले आहेत . कालांतराने बदलत्या जीवनशैलीमुळे नूडल्स संपूर्ण आशियामध्ये लोकप्रिय झाले आणि ते इतर ठिकाणी देखील खाल्ले जाऊ लागले. जपानमध्ये तेथील बकव्हीटपासून बनवलेले सोबा नूडल्स प्रामुख्याने खाल्ले जातात.

भारतातील पारंपारिक नूडल्स

स्कॉलर ब्लॉगमध्ये असेही म्हटले आहे की नाचणी प्रोटो-नूडल्स सुमारे 2300 ईसापूर्व पासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहेत, जे कदाचित स्थलांतरितांमुळे येथे आले असावेत. सेवियान हे भारतातील एक पारंपारिक नूडल आहे, जे अजूनही घरांमध्ये महिला हे नुडल्स तयार करून ते वाळवतात आणि वाळवल्यानंतर तयार करतात आणि दुधापासून बनवले जातात. ज्याला आपण सध्या शेवया म्हणतो. 1983 मध्ये इन्स्टंट नूडल्स बाजारात विकण्यास आले, ज्यामुळे ते खूप लोकप्रिय झाले आणि नूडल्सच्या जगात क्रांती घडवून आणली. आजकाल प्रत्येक कार्यक्रमात जेवण्यास नूडल्सचे प्रकार ठेवले जाऊ लागले आहेत. तथापि त्याची संकल्पना खूप जुनी असली तरी आज या नुडल्सला खूप मागणी आहे.