बाई बाई पपई! आठवड्यातून 3-4 वेळा चेहऱ्याला लावा, मिळवा Actress सारखा चेहरा

| Updated on: May 10, 2023 | 5:03 PM

आज आम्ही तुमच्यासाठी पपई फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. या फेसपॅकचा वापर करून तुमची त्वचा मऊ, चमकदार आणि तरुण दिसते, तर चला जाणून घेऊया पपईचा फेसपॅक कसा बनवायचा.

बाई बाई पपई! आठवड्यातून 3-4 वेळा चेहऱ्याला लावा, मिळवा Actress सारखा चेहरा
Papaya on face
Follow us on

मुंबई: पपईमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या त्वचेला खोलवर हायड्रेट करण्यास मदत करतात, जेणेकरून आपली त्वचा मुरुम आणि पिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुरक्षित राहते. याशिवाय पपईमध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात जे आपल्या त्वचेवरील वृद्धत्वाच्या चिन्हांना आळा घालण्यास मदत करतात. आज आम्ही तुमच्यासाठी पपई फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. या फेसपॅकचा वापर करून तुमची त्वचा मऊ, चमकदार आणि तरुण दिसते, तर चला जाणून घेऊया पपईचा फेसपॅक कसा बनवायचा.

पपई फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 चमचे पपईचा पल्प
  • 2 चमचे काकडीचा रस
  • अर्धा चमचा मध

पपईचा फेस पॅक कसा बनवावा?

  • पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी आधी एक छोटी वाटी घ्या.
  • नंतर त्यात पपईचा पल्प, काकडीचा रस आणि मध घाला.
  • यानंतर या सर्व गोष्टी नीट मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा पपईचा फेसपॅक तयार आहे.

पपई फेस पॅक कसा वापरावा?

  • पपईचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून स्वच्छ करा.
  • नंतर तयार केलेला पॅक आपल्या हलक्या हातांनी चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावा.
  • यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावून सुमारे 10-15 मिनिटे वाळवून घ्यावा.
  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून कमीतकमी 3-4 वेळा हा पॅक वापरला पाहिजे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)