Papaya Leaf | पपईच्या पानाने वाढेल पाचन शक्ती, कर्करोगाच्या पेशींनाही करेल प्रतिबंध!

| Updated on: Mar 03, 2021 | 10:27 AM

आपण सर्वचजण पपईचे सेवन करतो आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांविषयी देखील आपल्याला माहिती असेलच. पपईशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा आपल्या आरोग्याला फायदा होतो.

Papaya Leaf | पपईच्या पानाने वाढेल पाचन शक्ती, कर्करोगाच्या पेशींनाही करेल प्रतिबंध!
पपईची पाने
Follow us on

मुंबई : आपण सर्वचजण पपईचे सेवन करतो आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांविषयी देखील आपल्याला माहिती असेलच. पपईशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. आपल्याला माहित आहे का की, पपईची पाने आपल्यासाठी पपईच्या फळाइतकीच फायदेशीर आहेत. पपईमध्ये अनेक औषधी गुणधर्म लपलेले असतात आणि पपईच्या पानांमध्येही अनेक औषधी गुण असतात, जे बर्‍याच रोगांवर उपचार म्हणून वापरले जातात (Papaya Leaf benefits for health and immunity).

लवकरच उन्हाळ्याचा ऋतू येत आहे आणि या हंगामात लोकांना पपई खूप खायला आवडते. या मोसमात पपईचा वापर शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांसाठी पपईची पाने खूप फायदेशीर असतात. हे केवळ आपली प्रतिकारशक्ती वाढवत नाही, तर स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या बर्‍याच समस्यांवर उपचार करते. पपईची पाने आपल्या पाचन तंत्रास बळकट करण्यासाठी काम करतात. चला तर, जाणून घेऊया पपईच्या पानांचे काय फायदे आहेत?

पपईची पाने पीरियडमधील वेदना कमी करते.

पीरियड्स दरम्यान स्त्रिया वारंवार ओटीपोटात दुखण्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत स्त्रियांनी पपईची पाने, चिंचा, मीठ हे घटक एक ग्लास पाण्यात मिसळून ते त्याचा काढा तयार करावा व त्याचे सेवन करावे. लवकरच, या प्रकारच्या वेदनांपासून आराम मिळेल.

कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंधित करतो.

पपईच्या पानांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. ते गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांमध्ये खूप प्रभावी आहेत.

रक्तातील प्लेटलेट वाढवतात.

आपण पपईच्या पानांचा रस प्यायल्यास, तो आपल्या रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्याचे काम करतो. प्लेटलेट्स कमी झाल्यास या पानांचा रस दोन चमचे रस दररोज घ्या आणि तीन महिन्यांपर्यंत सतत याचे सेवन करा (Papaya Leaf benefits for health and immunity).

संसर्ग पासून संरक्षण

पपईची पाने जीवाणू आणि संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी आहेत. ते रक्तातील पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट वाढवण्यात देखील मदत करतात.

डेंग्यूचा संपूर्ण उपचार

पपईच्या पानाचा रस डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांमध्ये खूप प्रभावी आहे. तापामुळे आणि शरीरात कमजोरी वाढल्यास त्याचे सेवन केल्यामुळे प्लेटलेट कमी होण्यापासून प्रतिबंध करतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी

संशोधनानुसार, पपईच्या पानांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. याचा ज्यूस प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि किडनी, लिव्हर आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.

बद्धकोष्ठता आणि मूळव्याधावर परिणामकारक

पपईला लॅक्सेटिव्ह म्हणून ओळखले जाते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Papaya Leaf benefits for health and immunity)

हेही वाचा :

Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!

Honey Benefits | त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या समस्येवर लाभदायी ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे