Honey Benefits | त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या समस्येवर लाभदायी ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे

जर, आपली त्वचा देखील कोरडी असेल, तर याचा अर्थ असा की, आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोरडेपणामुळे, चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारचा मेक-अप करता येत नाही.

Honey Benefits | त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या समस्येवर लाभदायी ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे
दूध आणि मधाचा असा करा वापर
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 9:03 AM

मुंबई : आपल्या सर्वांच्या त्वचेचे प्रकार वेगवेगळे आहेत. काहींची त्वचा तेलकट आहे आणि काहींची कोरडी त्वचा आहे. जर, आपली त्वचा देखील कोरडी असेल, तर याचा अर्थ असा की, आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोरडेपणामुळे, चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारचा मेक-अप करता येत नाही. तसेच, त्वचा उग्र दिसायला लागते. अशावेळी आपण मध वापरू शकता (Honey benefits for skin care know the home remedies for dry skin).

जर, तुम्हालासुद्धा कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल, तर आपण मध वापरू शकता. मध आपली त्वचा हायड्रेट करण्यासाठी, तसेच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. कोरड्या त्वचेवर मध लावून आपण तिला मॉइश्चराइझ करू शकता. चला तर, मधाच्या ‘या’ फायद्यांविषयी जाणून घेऊया…

मधामुळे त्वचेला होणारे फायदे :

हायड्रेट त्वचा

मध एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा परत आणण्याचे काम करते. दररोज मध लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी दिसते. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, जे आपल्या जखमा बऱ्या करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त मध संक्रमण कमी करण्यात देखील मदत करतो. आपल्याला त्वचेची कोणतीही समस्या असल्यास आपण मध वापरू शकता.

अँटी-एजिंग

मधात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळासाठी तरुण राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त हे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक ओळी कमी करते. मधात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचा टोन सुधारण्याचे काम करतात. याशिवाय ते त्वचेचे पीएच पातळी संतुलित ठेवतात आणि पोर्स साफ करून ब्लॅकहेड्स कमी करतात (Honey benefits for skin care know the home remedies for dry skin).

अशाप्रकारे वापरा मध

इन्स्टिट ग्लो मिळवण्यासाठी

कोरडेपणाच्या समस्येमुळे आपली त्वचा रुक्ष व निर्जीव दिसत असेल, तर कोरड्या त्वचेपासून मुक्त होऊ इच्छित असल्यास, एक चमचा मधात थोडी केळी कुस्करून मिसळा आणि त्याने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे आपला चेहरा चमकू लागेल

पपई आणि मध पेस्ट

पपई आणि मध मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. किमान 30 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. हे मिश्रण लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमं बरे होतील. तसेच, आपली त्वचा देखील मुलायम दिसेल.

जोजोबा ऑईल आणि मध

चेहरा स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही मधाचा वापर करु शकता. यासाठी एक चमचा मधात जोजोबा ऑईल आणि चिमुटभर हळद मिसळा. कॉटन बॉलच्या सहाय्याने हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. निस्तेजपणा कमी होऊन चेहऱ्याची चमक वाढेल.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Honey benefits for skin care know the home remedies for dry skin)

हेही वाचा :

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.