Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!

प्रत्येक मुलीला स्वतःच्या लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही, तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:36 AM, 3 Mar 2021
Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!
त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स

मुंबई : प्रत्येक मुलीला स्वतःच्या लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही, तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे. जर, त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला होणार नाही. जर, आपणही लवकरच ‘वधू’ बनणार असाल, तर लग्नाच्या दिवशी आपली त्वचा चमकदार दिसावी म्हणून आतापासून आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. चला तर, त्वचा सुधारण्यासाठीच्या काही नैसर्गिक टिप्स जाणून घेऊया…(Bridal Beauty Tips for glowing face in wedding)

त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स :

– दुधाची साय आणि बेसन पीठ यांचे मिश्रण चेहऱ्यासाठी खूप चांगला फेस पॅक मानला जातो. आपण दररोज हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि तो कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवसांतच त्वचेवरील डाग कमी होतील आणि त्वचेची गुणवत्ताही सुधारेल.

– नितळ चेहऱ्यासाठी मसूर डाळीचा फेस पॅकही खूप चांगला मानला जातो. यासाठी मसूर डाळ रात्रीच्या वेळी पाण्यात भिजवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून, त्यात दूध व मध मिसळा आणि किमान 15 मिनिटांसाठी तो चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

– चारोळी पॅक तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनवतो. चारोळी रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर सकाळी त्याची बारीक पेस्ट करून घ्या. मग, त्यात दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर चेहरा स्वच्छ करा (Bridal Beauty Tips for glowing face in wedding).

– दुधात बेसन पीठ, एक चिमूटभर हळद मिसळून ते चेहऱ्यावर लावा, वाळवल्यानंतर चेहरा नीट स्वच्छ धुवा.

– कॉफी पावडरमध्ये मध मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. हा एक चांगला स्क्रब म्हणून देखील काम करते. हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी चोळा. कोरडा झाल्यानंतर चेहरा स्वच्छ करा.

– पपई किंवा टोमॅटोच्या रसाने चेहऱ्यावर मसाज करा. त्वचा काही दिवसांतच चमकदार दिसू लागेल.

हेही लक्षात घ्या!

या उपायांसह आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. जास्तीत जास्त पौष्टिक आहार घ्या. अधिकाधिक फळे खा. नारळाचे पाणी प्या. जेणेकरून शरीराला आणि त्वचेला संपूर्ण पोषण मिळेल. तसेच, भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीर निर्जलीकरण होणार नाही. पाण्याअभावी चेहऱ्याचे सौंदर्य देखील कमी होते.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Bridal Beauty Tips for glowing face in wedding)

हेही वाचा :

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Healthy Eating |  काम करत जागण्यामुळे रात्री भूक लागतेय? मग, नक्की खा ‘हे’ लेट नाईट स्नॅक्स