Parenting Tips: मुलांसमोर कधीच बोलू नका ‘या’ विषयांवर; अन्यथा करावा लगेल पश्चात्ताप!

| Updated on: Jul 26, 2022 | 4:50 PM

Parenting Tips: तुमच्या मुलांनी जिवनात योग्य दिशेने जावे, योग्य विचार करावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला काही गोष्टी चुकूनही सांगू नये, हे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना कधीही सांगू नये.

Parenting Tips: मुलांसमोर कधीच बोलू नका ‘या’ विषयांवर; अन्यथा करावा लगेल पश्चात्ताप!
Parenting Tips
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Parenting Tips: प्रत्येक पालकाची इच्छा असते की, आपल्या मुलाने योग्य मार्गावर ( the right track) जावे आणि आयुष्यात कधीही चुकीचे काम करू नये. पण अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत पालक अशा अनेक गोष्टी मुलांना सांगतात, ज्याचा त्यांच्या हृदयावर आणि मनावर खूप वाईट परिणाम (Bad results) होतो. अशा स्थितीत मुलाशी बोलताना तुम्ही काय बोलत आहात आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांच्यात गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता वाढतच जाते. काहीवेळा मुले एखाद्या गोष्टींचा वेगळाच काहीतरी अर्थ काढतात. अशा परिस्थितीत मुलांशी काहीही बोलताना पालकांनी त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ (wrong meaning) मुलांकडून लावला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे पालकांनी काही गोष्टी मुलांसमोर कधीही बोलू नये अथवा त्यांना सांगू नये अन्यथा त्यांचे अत्यंत वाईट परिणाम पालकांना भविष्यात भोगावे लागू शकतात.

पती-पत्नीने  ऐकमेकांबद्दल मुलांदेखत वाईट बोलू नये

अनेक वेळा रागाच्या भरात मुलांसमोर इतरांबद्दल आपण काहीतरी वाईट-साईट बोलतो. चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि पॅरेंटिंग टीनएजर एक्स्पर्ट अँजेला कारंजा म्हणतात की, अनेक वेळा लोक आपल्या जोडीदारावर किंवा मुलांसोबतच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर टीका करताना हे विसरतात की, मूल तुमच्यासोबत राहते तेवढाच वेळ इतर लोकांसोबत घालवतो. अशा परिस्थितीत, तुमच्या बोलण्यामुळे, त्याला स्वतःला दोन वेगवेगळ्या भागात विभागल्यासारखे वाटू लागते. बऱ्याच वेळा अशा वागण्यामुळे आणि सतत आपल्या जोडीदाराला दूषण देणे, त्याच्या व्यंगावर टिका करणे, घालून-पाडून बोलणे यामुळे मुले अशा लोकांचा तिरस्कार करू शकतात, आणि हेच सर्वांत गंभीर आहे. आई किंवा वडील याला सर्वस्वी कारणीभूत असतात दोघांपैकी एक त्या मुलांसाठी व्हिलन ठरतो..करण सतत त्याच्या कानावर त्या व्यक्तीच्या वाईट बाबीच पडत असतात.

हे सुद्धा वाचा

जबाबदाऱ्यांची भीती

मुलांशी बोलताना हे लक्षात ठेवा की, त्यांच्यासमोर कधीही पैसा, आजार याविषयी बोलू नका. जेव्हा पालक पैशाबद्दल टेन्शन घेतात आणि मुलांसमोर त्याबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांची भीती मुलांमध्ये स्थानांतरित करतात. अनेक वेळा असे केल्याने मुलांवर अनाहूत दडपण येते. कारण मुलंही तुमच्या प्रमाणे त्याचं टेन्शन घेवू लागतात, जे त्यांना हाताळता येत नाही.

पालकत्वाच्या टिप्स:

जर तुम्हाला मुलांना चांगले आणि यशस्वी व्यक्ती बनवायचे असेल तर या 3 गोष्टीची गाठ बांधून घ्या, तुम्हाला नंतर पश्चात्ताप होणार नाही
१) मुलांची इतरांशी तुलना- मुलांची तुलना इतरांशी करणे अजिबात योग्य नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची तुलना दुसऱ्या कोणाशी करता तेव्हा मुले स्वतःचा इतरांकडून अंदाज घेऊ लागतात. इतरांशी तुलना केल्यास मुलांचा विश्वास तुटायला लागतो आणि ते तणावाचे शिकार बनतात.

२) दुःखी होऊ नका – पेरेंटिंग एक्सपर्ट्स म्हणतात की, जर तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीबद्दल दुःख होत असेल आणि तुम्ही त्या दुःखातही त्याला हसत राहण्यास सांगितले तर त्याचा मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक वेळा मुले आपले दुःख व्यक्त करू शकत नाहीत आणि बाहेरील लोकांच्या नजरेत स्वतःला आनंदी दाखवू शकत नाहीत, जे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक

३)तू जन्मलाच नसता तर बरं झाल असत’ – तुम्ही कितीही रागवला असाल, चिडला असाल मात्र कधीच तुमच्या मुलांना असे सांगू नका की, तू जन्मला नसता तर बरं झालं असते, कारण कोणताच मुलगा आपल्या आई-वडीलांनी असे बोललेलं सहन करू शकत नाही. परिणामी त्या मुलाच्या भावना तर दुखावतातच पण त्या सोबत त्याचा आत्मसन्मानही दुखावला जातो. त्याला कोणीच पसंत करत नाही, असा न्यूनगंड त्या मुलाच्या मनात येऊ शकतो.

4) पारंपरिक टिप्पण्या टाळा- मुले रडत नाहीत किंवा मुलींनी शांत बसावे. अशा कमेंट्सचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून थांबवता तेव्हा ते शांत राहायला शिकतात आणि त्यांच्या मनात काय आहे, याचा अंदाज घेता येत नाही. ते आपल्या मन-मस्तिष्काचे म्हणणे एकत नाहीत…ते एकलकोंडी होवुन बधीर हेातात.अशा परिस्थितीत, जेव्हा कोणी त्याच्याशी चुकीचे वागत- बोलत असेल, तेव्हा ते त्याचा प्रतिकार करू शकत नाही. आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, यामुळे ते मनातल्या मनात घुटमळतात.