पालकांनी आपल्या मुलाच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्सचे करा पालन

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार आणि चांगले गुण असावेत असे वाटते. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला पाहिजे तितका वेळ मुलांना देता येत नाहीये. तर आपण आपल्या मुलांचे योग्य संगोपन कसे करू शकतो ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

पालकांनी आपल्या मुलाच्या योग्य संगोपनासाठी या महत्त्वाच्या टिप्सचे करा पालन
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 8:11 PM

आजच्या आधुनिक युगात अनेक पालकांना आपल्या मुलांना चांगले संगोपन करण्यासाठी काय करावे हे माहित नाही. या धावपळीच्या जीवनात, पैसे कमवणे, करिअर घडवणे आणि नंतर मुलाचे संगोपन करणे हे एक आव्हान आहे. प्रत्येक पालकाला त्यांचे मूल सुसंस्कृत, शैक्षणिकदृष्ट्या कुशल आणि समाजात चांगले नाव कमावणारे असावे असे वाटते. तर, पालकांनी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी काय करावे हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी संगोपन करण्यासाठी पालकांनी काय करावे?

1. मुलांना वेळ द्या-

आजच्या आधुनिक जगात पालक त्यांच्या मुलांची प्रत्येक मागणी पूर्ण करतात. जर त्यांनी खेळणी मागितली तर ते त्यांना खेळणी लगेच आणून देतात. तुम्हाला जर तुमच्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असेल तर त्यांना फक्त त्यांच्या दैनंदिन दिनचर्येसाठीच नाही तर त्यांना तुमचा वेळ द्या. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर त्यांना किमान 1 तास किंवा 30 मिनिटे तरी द्या.

2. स्क्रीन टाइम कमी करा-

आजकाल जर एखादं मूल रडत असेल तर आपण त्यांना शांत करण्यासाठी किंवा अनेकदा आपण पाहतो की नीट एका ठिकाणी शांत बसून जेवण करता यावे यासाठी मोबाईल फोन देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुलांसाठी हे किती धोकादायक आहे? जास्त स्क्रीन टाइममुळे त्यांच्या डोळ्यांवर, मेंदूवर आणि बोलण्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही घरी असाल तेव्हा तुमच्या मुलाचा मोबाईल फोन वापर मर्यादित करा आणि पालकांनी देखील मुलांसमोर मोबाईल फोनचा वापर मर्यादित करा.

3. कोणाशीही तुलना करू नका-

तुमच्या मुलांची तुलना कधीही कोणाशीही करू नका, जरी ते अभ्यासात कमकुवत असले तरीही. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तुमच्या मुलांची इतरांशी तुलना करण्याऐवजी त्यांच्या ताकदीची प्रशंसा करा. यामुळे त्यांची प्रेरणा वाढेल.

4. जेव्हा मुलं चूक करतात तेव्हा त्यांना समजावून सांगा-

जेव्हा तुमचे मूलं चूक करते तेव्हा त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना गोष्टी समजावून सांगा. छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडल्याने त्यांना तुमची भीती वाटेल आणि पुढच्या वेळी ते त्यांची चूक लपवण्यासाठी खोटे बोलू शकतात. म्हणून, रागावण्याऐवजी शांत बसा आणि त्यांना गोष्टी समजावून सांगा.

5. स्वतः एक आदर्श बना

लहान मुलं ही पालक जसे संस्कार देऊन घडवणार तसे ते बनतील. म्हणून तुमच्या मुलाला जसे बनवायचे आहे तसेच व्हा, कारण मुले निरीक्षणातूनच शिकतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांना खरं बोलावे असे वाटत असेल, तर तुम्ही खोटे बोलणे टाळले पाहिजे. समजा तुमच्या मुलांनी हातात पुस्तक घेऊन वाचावं असं वाटत असेल तर त्याआधी तुम्हीही हातात पुस्तक धरले पाहिजे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us