त्वचेचा रंग उजळण्यासाठी बटाट्याचा असा वापर करा; वाचा अधिक माहिती

| Updated on: May 28, 2021 | 1:14 PM

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि निरोगी त्वचा ठेवण्यासाठी बर्‍याचदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो.

त्वचेचा रंग उजळण्यासाठी बटाट्याचा असा वापर करा; वाचा अधिक माहिती
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि निरोगी त्वचा ठेवण्यासाठी बर्‍याचदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. कधीकधी कॉस्मेटिक उत्पादने किंवा घरगुती उपचारही करून पाहतो. काही लोक यासाठी ब्युटी पार्लरचा आधार घेतात. परंतु, कोरोनामुळे सगळ्याच सेवा ठप्प झाल्याने लोक घरातच अडकून पडले होते. याकाळात बरेच लोक घरगुती उपचार करून पाहत आहेत. आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या काही वस्तूंच्या आधार घेऊन देखील आपण चेहऱ्याचा रंग गोरा करू शकतो. (Potatoes are extremely beneficial for the skin)

फेस मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 1 कट केलेला बटाटा, 2 चमचा दूध, 3-4 थेंब ग्लिसरीन एका वाटीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा मग हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि कमीतकमी 15-20 मिनिटे चेहऱ्यावर तसेत ठेवा. जेव्हा ते चांगले सुकेल तेव्हा ते पाण्याने धुवा. टॉवेलने पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा. ग्लिसरीनचा उपयोग आपली त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर, बटाटा आपल्या त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकतो. यामुळे चेहरा ग्लो देखील करू लागतो.

आपल्या चेहर्‍यावरील डाग दूर करण्यात बटाटा उपयुक्त आहे. बटाट्यामध्ये लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण आपण चेहऱ्याला लावले तर डागांपासून आपली त्वचा मुक्त होईल. 2 चमचा बटाटाचा रस, 2 चमचा काकडीचा रस, 1 चमचा लिंबूचा रस आणि हळद हे सर्व साहित्य मिक्स करा आणि चेहऱ्यावर चांगले लावा. हे चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण पंधरा मिनिटे तसेच ठेवा ते कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हे लावले पाहिजे.

जर, तुमची त्वचा कोरडी असेल, तर मसूर डाळीची पूड, गुलाब पाणी आणि दूध रात्रभर भिजवून ठेवून, सकाळी बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट जवळपास 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. हा फेस पॅक वापरल्याने तुमची त्वचा चमकदार बनेल. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करतो. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मध आणि मसूर डाळ यांची पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा. मधाचा फेसपॅक लावल्यास त्वचेच्या टॅनिंगची समस्या दूर होईल.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Potatoes are extremely beneficial for the skin)