घरी तयार करा ‘हा’ आयुर्वेदिक काढा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

| Updated on: May 26, 2021 | 4:09 PM

कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही.

घरी तयार करा ‘हा’ आयुर्वेदिक काढा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती
आयुर्वेदिक काढा
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यावर आपण भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोणतेच आजार आपल्याला होणार नाही. (Prepare this ayurvedic extract at home and boost the immune system)

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला चार ते पाच तुळशीची पाने, तीन ते चार पुदिन्याची पाने, गवती चहा, आद्रक, लसूण, हिंग, गुळ आणि काळी मिरी लागेल. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा त्यामध्ये गुळ सोडून बाकी सर्व पदार्थ त्या पाण्यात मिसळा. साधारण तीस मिनिटे हे पाणी गॅसवर चांगले उसळूद्या. त्यानंतर यामध्ये गुळ मिसळा आणि कोमट करून प्या. या खाय पेयामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शक्य असल्यास हे पेय आपण सकाळी रिकाम्या पोटी प्या.

सर्वात आधी काढा बनवण्यासाठी काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पानं, दो भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 3 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो.

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.

संबंधित बातम्या : 

(Prepare this ayurvedic extract at home and boost the immune system)