प्रेशर कुकर वापरताना करताय ‘या’ 5 चुका, इशारा ओळखा, नाहीतर जीव येऊ शकतो धोक्यात!

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रेशर कुकरची फार मोठी मदत होते. पण प्रेशर कुकर वापरताना काही चुका झाल्यास, त्या तुमच्या जीवावर देखील बेतू शकतात... तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चुका...

प्रेशर कुकर वापरताना करताय या 5 चुका, इशारा ओळखा, नाहीतर जीव येऊ शकतो धोक्यात!
| Updated on: Apr 28, 2026 | 6:05 PM

कमी वेळात स्वयंपाक पूर्ण करण्यासाठी प्रेशर कुकर खूप उपयुक्त आहे… आजच्या काळात पाहायला गेलं तर, स्वयंपाकघरात प्रेशर कुकर नसलेले एकही घर नसेल. पण प्रेशर कुकरचा वापर करताना काही गोष्टीनी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, लहानशा निष्काळजीपणामुळेही त्याचा बॉम्बसारखा स्फोट होऊ शकतो आणि जीवितहानी होऊ शकते. कुकर स्फोटाच्या कारणांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, आपल्याकडून होणाऱ्या काही सामान्य चुकाच या अपघातांचे मूळ कारण आहेत. हे अपघात टाळण्यासाठी येथे 5 महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

कुकर पूर्णपणे भरू नका: स्वयंपाकघरात प्रेशर कुकर वापरणे हा वेळ आणि गॅस वाचवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण, निष्काळजीपणे कुकरचा वापर केल्यास ते जीवघेणे ठरु शकते. बरेच लोक अन्न पटकन शिजवण्यासाठी कुकर अन्नाने भरतात. मात्र, कुकर त्याच्या क्षमतेच्या जास्त कधीही भरू नये. विशेषतः, डाळी आणि तांदूळ यांसारख्या गोष्टी शिजताना फुगतात. त्यामुळे, त्या फक्त अर्ध्यापर्यंत भरणे सुरक्षित आहे.

गॅस्केट (रबर) ची गुणवत्ता: जर कुकरच्या झाकणावरील रबर सैल किंवा तडकलेले असेल, तर ते ताबडतोब बदलले पाहिजे. गॅस्केटमुळे वाफ बाजूने बाहेर गळू शकते, ज्यामुळे आतमध्ये अपुरा दाब निर्माण होतो किंवा परिस्थिती धोकादायक बनू शकते.
पाण्याचे प्रमाण: कुकरमध्ये पुरेसे पाणी न घालता स्वयंपाक करणे खूप धोकादायक आहे. पाणी नसल्यास, कुकरचा तळ जास्त गरम होऊन सेफ्टी व्हॉल्व्ह फुटू शकतो. म्हणून, शिजवल्या जाणाऱ्या पदार्थानुसार योग्य प्रमाणात पाणी घाला.

व्हेंट पाईपची स्वच्छता: प्रेशर कुकरच्या झाकणावरील व्हेंट पाईप नेहमी स्वच्छ असावा. जर त्यात अन्नाचे कण अडकले, तर आत तयार झालेली वाफ बाहेर पडू शकणार नाही. यामुळे आतमध्ये अतिरिक्त दाब निर्माण होऊन कुकरचा स्फोट होऊ शकतो.

झाकण जबरदस्तीने काढू नका: तसेच, कुकरमधील दाब पूर्णपणे कमी झाल्याशिवाय झाकण जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करू नका. स्वयंपाक झाल्यावर लगेच झाकण काढण्याचा प्रयत्न करू नका. शिट्टी वाजल्यानंतरही आत वाफ शिल्लक राहू शकते. दाब पूर्णपणे कमी झाल्याची खात्री झाल्यावरच झाकण काढा. या पाच खबरदारीच्या उपायांचे पालन करून तुम्ही तुमचे स्वयंपाकघर सुरक्षित ठेवू शकता. तुमचा कुकर नियमितपणे तपासा आणि अपघात टाळा.

Follow Us